Sarkari Naukri : इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; दरमहा भरघोस पगार, आजच अप्लाय करा

Government Jobs For Engineers : इंजीनिअरिंग आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांना कोणती परीक्षा द्यावी लागले. तसेच फॉर्म कसा भरायचा याची माहिती जाणून घेणार आहोत.
Government Jobs For Engineers
Sarkari NaukriSaam TV
Published On

हिंदुस्तान फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स लिमिटेड (HURL)मध्ये इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी भरती काढण्यात आली आहे. देशातील ही एक महत्वपूर्ण कंपनी आहे. येथे फर्टिलाइजर्स आणि रसायनांची निर्मिती यांवर काम होते. सध्या येथे एकूण २१२ पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. त्यामुळे आज याच भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Government Jobs For Engineers
Engineering College : आत्महत्येपुर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाने चिठ्ठीत लिहिलं...

पद आणि योग्यता

HURL मार्फत काढण्यात आलेल्या भरतीमध्ये दोन वेगवेगळ्या पदांसाठी जागा रिक्त आहेत. यामध्ये ग्रॅज्यूएट ट्रेनी (GET) या पोस्टसाठी ६७ जागा रिक्त आहेत. तर डिप्लोमा इंजीनिअर ट्रेनी (DET) पदासाठी १४५ जागा रिक्त आहेत.

शिक्षणाची अट

ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांसाठी पात्रता काय हे जाणून घेऊ. या उमेदवारांकडे केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनीक आणि मेकॅनिकल अशी पदवी असणे महत्वाचे आहे. तसेच या उमेदवारांनी ही पदवी ६० टक्के गुण किंवा त्याहून जास्त गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी.

निवड कशी होणार

HURL भरतीसाठी उमेदवारांना संगणक आधारित चाचणी (CBT) बेस्ड परीक्षा द्यावी लागते. यामध्ये दस्तऐवज पडताळणीचा देखील समावेश आहे. ही परीक्षा एकूण १२० गुणांची असणार आहे. त्यासाठी परीक्षेत १५० प्रश्न विचारले जातील. तर अचूक उत्तरासाठी एक गुण दिला जाणार आहे. ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये होणार आहे.

पगार किती?

परीक्षेसाठी अर्जाची फी GET साठी ७५० रुपये आणि DET साठी ५०० रुपये इतकी आहे. तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीनंतर १.४० लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

Government Jobs For Engineers
Contractors Engineer: राज्यातील अभियंता कंत्राटदार ७ मे पासून करणार काम बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com