Breaking News

CIDCO Recruitment: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी, सिडकोत भरती; पगार ८१०००; अर्ज कसा करावा?

CIDCO Recruitment 2025: सिडकोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सिडकोमध्ये क्लर्क पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
Cidco Recruitment
Cidco RecruitmentSaam Digital
Published On: 

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिडकोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सिडको म्हणजे औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

सिडकोमध्ये लेखा लिपिक, अकाउंटिंग क्लर्क पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सिडकोमध्ये पर्मनंट नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. (CIDCO Recruitment)

Cidco Recruitment
Central Bank Jobs: खुशखबर! सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; २६६ रिक्त जागा; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सिडको नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अकाउंटन्सी/फायनान्शियन मॅनेजमेंट / कॉस्ट अकाउंटिंग / मॅनेजमेंट अकाउंटिंग / ऑडिटिंगसह बी. कॉम / बीबीए पदवी प्राप्त केलेली असावी. सिडकोमध्ये २२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ही भरती एका वर्षाच्या कालावधीसाठी होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांना २५,००० ते ८१,००० रुपये पगार मिळणार आहे. (CIDCO Job)

Cidco Recruitment
Bank Job: युको बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्ज कसा करावा?

रेल्वेत नोकरी

रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ईस्ट सेंट्रल रेल्वेत ११५४ अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी rrcecr.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२५ आहे.

Cidco Recruitment
Government Job: वनविभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५०,००० रुपये; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com