बांधकाम व्यावसायिक Yusuf Lakadawala यांचे निधन

युसुफला कर्करोगाचा त्रास होता. त्याला आर्थररोड तुरूंगात ठेवण्यात आलं होतं. रात्री अचानक त्याच प्रकृती खालावली. म्हणून त्याला जे.जे रुग्णालयात हलवण्यात आलं
बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावाला  यांचे निधन
बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावाला यांचे निधन
Published On

सुरज सावंत

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला (Yusuf Lakadawala) याचा आज जे जे रुग्णालयात (J.J.Hospital) निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून तो आजारी होता. सकाळी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला जे जे रुग्णालयात नेण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुख्यात गुंड दाऊदचा जवळचा हस्तक होता.

हे देखील पहा-

खंडाळा येथील हैद्राबादच्या निजाम कुटुंबियांच्या मालकीची 50 कोटी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बळकावल्याप्रकरणी ईडीने त्याची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत 2019 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट कागदपांच्या सहाय्याने खंडाळा येथील चार एकर(50 कोटी किमतीची) जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला(74) गुजरातमधून आर्थिक गुन्हे शाखेने 12 एप्रिल 2019 ला अहमदाबाद येथून अटक केली होती. लकडावाला विमानाद्वारे लंडनला जात असताना त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील बडगुजर यांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा लकडावालासह मोहन नायर नावाच्या व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आला होता.

बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावाला  यांचे निधन
सत्य परेशान हो सकता है पराजित नही: छगन भुजबळ भावूक

ऍफेडिव्हीट कम डीड ऑफ कन्फर्मेशन बनावट केल्याचा आरोप आहे. तसेच न झालेला व्यवहार या कागदपत्रांच्या सहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच हा प्रकार उघड होऊ नये यासाठी मुंबईतील नोंद करण्यात आलेले नोंदणी क्रमांक वापरले. तसेच मूळ कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

आरोपी गुप्ताच्या लोणावळा येथील सदनिकेत या व्यवहाराबाबत झालेल्या बैठकांत कट रचण्यात आला होता. आरोपींनी नवाबाच्या मालकीची साडेचार एकर जमीन बळकावण्यासाठी 1949 मधील बनावट करारपत्र बनवले. त्याची मुंबई निबंधक कार्यालयात नोंदणी झाल्याचे खोटे दाखवण्यात आले. तसेच मावळ दुय्यम निबंधक कार्यालयातील खरी कागदपत्रे गहाळ करण्याचा प्रयत्नही झाला होता.

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावाला, शौकत घौरी, भूमी अभिलेख विभागातील अधिकारी विकास ढेकळे आणि दलाल दीपक गुप्ता यांना अटक झाली होती. 50 कोटी रुपयांची जमीन बळकावण्यासाठी साडे अकरा कोटीं रुपये खर्च करण्यात आले होते. साडेअकरा कोटींतील सर्वांत मोठा वाटा म्हणजेच पाच कोटी ढेकळेच्या वाट्याला आले होते. बनावट डीडी आणि करारपत्र तयार करून जमीन कशी बळकावता येईल, बनावट कागदपत्रे खरी कशी भासवता येतील, याबाबत ढेकळेने युसूफला यंत्रणेतील पळवाटा सांगितल्या होत्या. गुप्ताला एक कोटी; तर घोरीला दीड कोटी रुपये देण्यात आले. आरोपी मोहन नायर याला युसूफकडून या कामासाठी चार कोटी मिळाले होते.

युसुफला कर्करोगाचा त्रास होता. त्याला आर्थररोड तुरूंगात ठेवण्यात आलं होतं. रात्री अचानक त्याच प्रकृती खालावली. म्हणून त्याला जे.जे रुग्णालयात हलवण्यात आल़ं, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com