Air strike | ...त्यामुळे तालिबानी भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाहीत - योगी आदित्यनाथ

मागील काही दिवसांपासून तालिबान्यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येथैमान घातलं. आहे मात्र तेच तालिबानी भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही कारण...
Air strike | ...त्यामुळे तालिबानी भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाहीत - योगी आदित्यनाथ
Published On

मुंबई : मागील काही दिवसांपासून तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये (Afghanistan and Pakistan) थैमान घातलं. आहे मात्र तेच तालिबानी भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही कारण भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा ही ताकदवान बनली आहे.

तसेच जर तालिबानने भारतामध्ये काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर एअर स्ट्राईक (Air strike) केला जाऊ शकतो याची त्यांना कल्पना आहे. आणि ही आपल्या देशाची प्रतिमा केवळ मोदींमुळे तयार झाल्याचे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM of Uttar Pradesh Yogi Adityanath) यांनी त्यांच्या भाषणात केलं आहे.

उत्तर प्रदेशात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणीला लागला असून आपल्या पक्षाने केलेल्या कामाचा तपशिल सादर करायला लागला आहे त्यामुळे योगींनी केलेलं वक्तव्य हे राजकीय दृष्ट्या अत्यंत चर्चेचा विषय बनलं आहे.

यावरती उत्तर प्रदेशची निवडणूक -

एकीकडे उत्तर प्रदेशच्या सीमेवरती सुरु असलेलं शेतकऱ्यांच तीन कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन (Movement against three agricultural laws) तर दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत Second Corona Wave गंगेत आलेल्या प्रेतांची लाट यामुळे सध्या तरी भाजपच्या विरोधात प्रदेशातील जनतेचा सुर असल्याच बोललं जात आहे. मात्र हिंदुत्व राम मंदीर (Ram Mandir) आणि राष्ट्रीय सुरक्षा या मुद्यांवरती भाजपला आगामी निवडणूका पार पाडाव्या लागणार आहेत त्यामुळे आजचं योगींच वक्तव्य महत्वपुर्ण मानलं जातं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com