Omicron: दिल्लीत निर्बंध लागणार ? केजरीवाल यांनी दिली महत्वाची माहिती

दक्षिण आफ्रिकेतून उद्भवलेल्या कोरोनाच्या नवीन (Omicron Variant) प्रकाराने भारतासह जगभरात चिंता वाढवली आहे.
Omicron: दिल्लीत निर्बंध लागणार ? केजरीवाल यांनी दिली महत्वाची माहिती
Omicron: दिल्लीत निर्बंध लागणार ? केजरीवाल यांनी दिली महत्वाची माहितीSaam Tv
Published On

दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) उद्भवलेल्या कोरोनाच्या नवीन (Omicron Variant) प्रकाराने भारतासह जगभरात चिंता वाढवली आहे. दिल्ली सरकारने ओमिक्रॉनच्या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी तयारी केली आहे. ओमिक्रॉन प्रकाराबाबत निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज माहिती की, आम्ही ओमिक्रॉनच्या धोक्याला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.

Omicron: दिल्लीत निर्बंध लागणार ? केजरीवाल यांनी दिली महत्वाची माहिती
'...म्हणून त्यांनी नव्याने गुन्हा दाखल केला'; आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राऊतांची पहिली प्रतिक्रिया

केजरीवाल म्हणाले की, गरज पडल्यास आम्ही आवश्यक निर्बंध लावण्यात येतील. सध्या, कोणतेही निर्बंध लादण्याची गरज नाही. यासोबतच शाळांच्या हिवाळी सुट्ट्या संपल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, केजरीवाल यांनी सोमवारी "दिल्ली की योगशाळा" या कार्यक्रमाचा शुभारंभ केला, ज्याचा उद्देश प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीकरांना नियमितपणे योगाभ्यास करण्यास मदत करणे हा आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक मोबाईल फोन नंबर लॉन्च करण्यात आला ज्यावर लोक मिस कॉल करू शकतात आणि योग शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ शकतात. याप्रसंगी dillikyogshala.com ही वेबसाइटही सुरू करण्यात आली.

कोरोनाला तोंड देण्यासाठी दिल्ली तयार?

केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, ओमिक्रॉन प्रकाराचा धोका लक्षात घेता, आपण जबाबदार सरकार म्हणून तयार राहणे आवश्यक आहे. जोपर्यंत बेडचा प्रश्न आहे, आम्ही 30,000 ऑक्सिजन बेड तयार केले आहेत आणि त्यापैकी सुमारे 10,000 आयसीयू बेड आहेत. याशिवाय 6,800 ICU खाटांचे बांधकाम सुरू असून ते फेब्रुवारीपर्यंत तयार होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com