रानटी डुक्करांच्या कळपाचा थेट बिबट्यावर हल्ला; पाहा व्हायरल व्हिडीओ

pigs eat leopard viral video : तमिळनाडूमधील या व्हायरल व्हिडीओमध्ये जंगलात रानटी डुक्करांकडून बिबट्याचा फडशा फाडताना दिसत आहे.
wild pigs attack on leopard in tamilnadu jungle video viral
wild pigs attack on leopard in tamilnadu jungle video viralSaam Tv
Published On

pigs eat leopard viral video : अनेकदा जंगलात हिंसक प्राणी बिबट्या हा हरण, झेब्रा सारख्या प्राण्यांचा फडशा फाडताना दिसतो. जंगलात बिबट्या दिसताच अनेक प्राण्यांची तारांबळ उडताना दिसते. सामान्य माणसांनाही बिबट्या (Leopard) एखाद्या प्राण्यावर हल्ला करतानाचा व्हिडीओ पाहूनही थरकाप उडतो. मात्र, एका व्हायरल व्हिडीओमध्ये जंगलात रानटी डुक्करांकडून (Pigs) बिबट्याचा फडशा फाडताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेक जण चकीत झाले आहेत. सदर बिबट्यावर रानटी डुक्करांच्या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (wild pigs attack on leopard in tamilnadu jungle video viral)

रानटी डुक्करांच्या कळपाने बिबट्यावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ ट्विटरवर यूझर 'वाइल्डलेन्स इंडिया'ने शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया उमटत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना 'वाइल्डलेन्स इंडिया'ने म्हटले आहे की, सदर व्हिडीओ तमिळनाडूमधील पलानी ते कोडईकनाल रस्त्याच्या दरम्यानचा आहे. व्हिडिओमधील बिबट्याचे मृत्यू झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर रानटी डुक्करांनी मृत बिबट्यावर फडशा फाडण्यास सुरुवात केली आहे.

wild pigs attack on leopard in tamilnadu jungle video viral
यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागत होती आग; समोर आले मोठे कारण

दरम्यान, सदर व्हिडीओमध्ये दिसत आहे की, डोंगराळ भागातील रस्त्यात एक बिबट्या मृत पावला आहे. त्या बिबट्याला काही रानटी डुक्करं खाण्याचा प्रयत्न करत आहे. त्या प्राण्यांजवळच एक बस उभी आहे. ज्या बसचा चालक हॉर्न वाजवून रानटी डुक्करांना पळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मृत बिबट्याभोवती जमा झालेले रानटी डुक्कर तुटून पडले आहेत.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com