Viral Video : भररस्त्यात बायको आणि गर्लफ्रेंडमध्ये हाणामारी; नवऱ्याने तिथंच काढली चप्पल अन्...

घरात बायको असली तरी एखादी तरी गर्लफ्रेंड असावीच अशी हौस कित्येक पुरुषांना असते. त्यामुळे बायको असूनही अनेकजण गर्लफ्रेंडच्या शोधात असतात.
Wife-Girlfriend clashed viral video
Wife-Girlfriend clashed viral videoSaam TV

Viral Video : घरात बायको असली तरी एखादी तरी गर्लफ्रेंड असावीच अशी हौस कित्येक पुरुषांना असते. त्यामुळे बायको असूनही अनेकजण गर्लफ्रेंडच्या शोधात असतात. नवऱ्याला गर्लफ्रेंड असली तरी बायकोची नजर असतेच. आजवर तुम्ही बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं आणि तिथेच धुलाई केली अशा, घटना तुम्ही ऐकली असतील. पण सोशल मीडियावर नवरा-बायको आणि गर्लफ्रेंडचा असा काही व्हिडीओ व्हायरल होतोय ज्याने सर्वांनाच हैराण करून सोडलं आहे.

Wife-Girlfriend clashed viral video
Viral Video : भाजप मंत्र्याला राग अनावर; थेट महिलेच्या कानशिलात लगावली; व्हिडीओ व्हायरल

लग्न झाल्यानंतरही आपल्याला गर्लफ्रेंड असल्याची माहिती नवऱ्याने कितीही लपवली तरी बायको काही संशय घेणं सोडत नाही. नवऱ्यानं बायकोपासून आपलं असं extra marital affair कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी कधी ना कधी बायकोला याचा थागपत्ता लागतोच. त्यातच नवऱ्याला जर बायकोनं गर्लफ्रेंडसोबत बघितलं मग तर काय राडा होतो हे सर्वांनाच माहित आहे.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, दोन महिला भररस्त्यात भांडताना दिसत आहे. वाद इतका विकोपाला गेलाय की दोघीही एकमेकींच्या झिंज्या उपटताना दिसत आहे. या महिला एकमेकींना मारहाण करत असताना एक पुरूष त्यांच्या आजूबाजूला फिरताना दिसतोय. या पुरुष या दोन महिलांपैकी एकीचा नवरा आणि एकीच बॉयफ्रेंड आहे.

या पुरूषासाठीच या दोघीही महिला एकमेकींना मारहाण करत असल्याचं सांगितलं जातंय. जेव्हा या दोघी एकमेकींवर तुटून पडल्या तेव्हा त्याने आपल्या पायातील चप्पल काढून त्यांना मारायला सुरुवात केली. त्या महिलांचं तसं त्यावेळी त्याच्याकडे फार लक्ष असलेलं दिसत नाही. त्या आपसातच भांडताना दिसत आहेत. त्यामुळे त्या दोघींना सोडवण्याच्या बहाण्यातून नवरा चपलेने मारतो आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जातंय. हा व्हिडीओ @mews_in ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी लाईक केलं असून हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com