भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक असलेला 'कारगिल विजय दिवस' का साजरा केला जातो? जाणून घ्या

भारतीय लष्कराच्या पराक्रमाचे प्रतीक समजला जाणारा कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे.
Kargil Vijay Diwas News
Kargil Vijay Diwas NewsSaam TV
Published On

मुंबई: भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक समजला जाणारा 'कारगिल विजय दिवस' आज देशभरात साजरा होत आहे. आजच्या या विजय दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शहीद जवानांना अभिवादन केलं आहे. १९९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. (Kargil Victory Day)

कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वपुर्ण घटना आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. मात्र, या भयानक अशा युद्धामध्ये आपल्या सैनिकांना देखील वीरमरण प्राप्त झालं होतं. मात्र, मायभूमीच्या रक्षणासाठी भारतीय जवानांनी प्राणाची पर्वा न करता हे युद्ध लढलं होतं.

Kargil Vijay Diwas News
सोनिया गांधींची आज पुन्हा ईडीकडून चौकशी, राजघाटासह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा निषेध

हे युद्ध जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु होतं. या युद्धात भारतीय लष्कराने (Indian Army) पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला आणि अखेर २६ जुलैला शेवटचं शिखरही जिंकले. हा दिवस आता 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.

१९९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत-पाकिस्तान (India-Pakistan) जे युद्ध झाले यामध्ये भारताने विजय मिळवला. त्या युद्धाच्या स्मरणार्थ आज दिनांक २६ जुलै रोजी कारगिलच्या द्रास येथील युद्ध स्मारकात साजरा केला जातो. १९९९ मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारताच्या या शिखरांवर घुसखोरी केली होती.

पाहा व्हिडीओ -

जवळपास १८ हजार फूट उंचीवर असलेल्या या शिखरावरून भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं. या युद्धामध्ये भारताचे ५०० जवान शहीद झाले होते. हे युद्ध अतिशय कठीण आणि धोकादायक युद्ध म्हणून ओळखले जाते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांनी काल मन की बातमध्ये देखील या विजय देिवसाचा उल्लेख केला. ‘कारगिल विजय दिवस’ आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील आहे. कारण, अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com