'जर बलात्कार थांबवू शकत नसाल तर मजा घ्या', काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे काँग्रेसचे आमदार रमेश कुमार (Congress MLA Ramesh Kumar) यांनी पुन्हा एकदा सभागृहात बलात्काराबाबत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे.
काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य Saam Tv
Published On

बंगळुरु : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे काँग्रेसचे आमदार रमेश कुमार (Congress MLA Ramesh Kumar) यांनी पुन्हा एकदा सभागृहात बलात्काराबाबत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. सभेला संबोधित करताना ते म्हणाले, एक म्हण आहे की जेव्हा बलात्कार (Rape) अपरिहार्य असतो तेव्हा झोपा आणि आनंद घ्या. नेमकी हीच परिस्थिती तुमची आहे. - When rape is inevitable, lie down and enjoy it, says congress MLA Ramesh Kumar In Karnataka Assembly

विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे वेळ मागत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रमेश कुमार यांनी वक्तव्य केले आहे. त्यादरम्यान सभापती म्हणाले की, सर्वांना वेळ दिला तर हे अधिवेशन कसे जाणार. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल, असे सभापती विश्वेश्वर हेगडे यांनी आमदारांना सांगितले. जसं चाललं आहे तसं सुरु राहू द्या आणि परिस्थितीचा आनंद घ्या. मी व्यवस्थेवर नियंत्रण ठेवू शकत नाही, माझी चिंता सभागृहाच्या कामकाजाची आहे, ती करायलाच हवी.

काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
नात्याला काळिमा! बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वहिनीवर बलात्कार

आमदाराच्या वक्तव्यावर सभापती हसू लागले

काँग्रेस आमदार राजेश कुमार यांनी सभापतींच्या या वक्तव्यानंतर ही आक्षेपार्ह टिप्पणी केली, जी ऐकून सभागृहातील सर्व सदस्य हसू लागले. या संपूर्ण घटनेतील सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे कुमार यांनी सभागृहात हे संतापजनक आणि भावनाशुन्य वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सभापतीच हसू लागले.

रमेश कुमार यांनी अशी अशोभनीय टिप्पणी करण्याची ही काही पहिली वेळ नाही. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी आपली तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी झाली आहे, असे ते म्हणाले होते. तिथे सोडले तर बलात्कार एकदाच होतो, पण बलात्कार झाल्याची तक्रार केल्यावर आरोपीला तुरुंगात टाकले जाते. पण त्याचे वकील विचारतात की हे कसे झाले? हे कधी आणि किती वेळा घडले? बलात्कार एकदाच होतो पण कोर्टात बलात्कार 100 वेळा होतो. ही माझी अवस्था आहे, असं ते म्हणाले होते.

सोशल मीडियावर संताप व्यक्त

या घटनेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच लोकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. रमेश कुमार यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी अशी मागणी आता सोशल मीडियामधून जोर धरु लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com