Weather Updates : ऐन हिवाळ्यात गायब झालेल्या थंडीमुळे राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईसह उपनगरातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यातही मुंबईकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. अशातच पुढील दोन दिवस देशातील विविध भागांत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest Marathi News)
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ शमल्यानंतर त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्टयात झाले. त्यामुळे दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांत पाऊस झाला. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही प्रभाव दिसून आला. राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात तयार झालेला गारवा कमी झाला. त्यातच गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील काही जिल्ह्यांतील तापमानात कमालीची वाढ झाली. त्यामुळे ऐन हिवाळ्यातही नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. अशातच देशातील काही भागात पुन्हा अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने (Weather Forecast) वर्तवला आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागांवर आणि पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागराच्या लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील दोन दिवसांत ते हळूहळू पश्चिम-वायव्य दिशेने श्रीलंकेच्या किनार्याकडे सरकण्याची दाट शक्यता आहे.
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, पुढील ४८ तासांत अंदमान-निकोबारच्या दक्षिणेकडील भागात एक किंवा दोन हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो. तटीय तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटने रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडूचा अंतर्गत भाग आणि केरळच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.