संभाजी थोरात
गोवा : गोव्यात विधानसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहत असून सत्ताधारी भाजपने ही निवडणूक जास्तच प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणी पक्षाचे निवडणूक प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासून (ता.13) 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. तर आज गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रम पार पडला आहे. तर आमदार, मंत्री यांना मार्गदर्शन आणि भेटीगाठीवर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी निवणूक प्रचाराबद्दल माहिती दिली, ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीन केलेल्या कामावर मत मागणार आहे.
हे देखील पहा-
गोव्यामध्ये आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर भाजपने गोव्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी आतापासून सुरुवात केली आहे. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीन केलेल्या कामावर मत मागणार आहे. मनोहर पर्रीकर यांच्यापासून प्रमोद सावंत यांच्यापर्यंत गोव्याला नवा चेहरा भाजपने दिला आहे. अनेक योजना योग्य प्रकारे गोव्यात राबवण्यात आल्या आहेत. असा विश्वास विरोधी पक्ष नेते आणि गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आज गृहमंत्री अमित शहा गोवा दौऱ्यावर त्यापार्श्वभूमीवर ते बोलत होते. गोव्यात भाजपात नवीन आणि जुन्यामध्ये वाद नाही. मात्र अनेकांच्या अपेक्षा असतात त्यातील पक्षाच्या हिताचा काय आहे हे पाहून निर्णय घेणार आहोत. मनोहर परिकर यांच्या कुटुंबाला राजकारणात डावलल्याबद्दल तयांनी भारतीय जनता पक्षामध्ये कोणी कुणाचे घरचे लोक आहेत तेवढ्यापुरतं स्थान मिळत नाही मनोहर पर्रीकर आणि इतर पक्ष उभा केला त्यांचे नाव आहे त्यांचा मुलगा आहे तो सामाजिक कार्य करतो त्यांच्या कर्तुत्वावर तो मोठा होईल, अस स्पष्ट केलं... गोव्यात तृणमूल कॉग्रेसच्या तयारी बाबत ते म्हणाले, ज्या पद्धतीन तृणमूल काँग्रेस निघाला आहे ती पद्धत गोवेकरांना आवडणार नाही. बंगाल मध्ये कशाप्रकारे हिंसाचार झालाय तसा इथं चालणार नाही अशी परंपरा असलेला पक्ष हा गोव्यात मूळ धरू शकेल असं वाटत नाही.
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हे फसवे पॅकेज आहे. यापूर्वी 11 हजार कोटीच जाहीर केले होतं ते कुठे आहे? हे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय झालेला नाही. शेतकऱ्याचा आणि त्याच्या सगळ्या योजना बांधावर जाऊन दिलेले आश्वासन पूर्ण होत नाही. केंद्र सरकार एनडीआरएफ आणि एसडीआरएफमधून वर्षाच्या सुरुवातीलाच पैसे देतं तो पैसा संपला की पुढचे पैसे देतात, केंद्र थांबत नाही. आमच्याही काळात केंद्र सरकार चार महिन्यांनंतर पैसे द्यायचे मात्र त्यावेळी आम्ही तसं म्हणायचं नाही, कारण अगोदर पैसे दिलेले असायचे. आता राज्य सरकारने विम्याचे 1700 कोटीही दिलेले नाहीत, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.