Dantewada IED Blast: 'उड गया, पुरा उड गया...'; दंतेवाडा स्फोटाचा भयानक व्हिडीओ आला समोर

Dantewada IED Blast: काल नक्षलवाद्यांनी केलेल्या आईईडी स्फोटातमध्ये 10 जवान शहीद झाले होते.
Dantewada IED Blast
Dantewada IED BlastSaam TV

Dantewada IED Blast:  छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या हल्ल्यात बचावलेल्या जवानाने हा व्हिडीओ शूट केला आहे. काल नक्षलवाद्यांनी  केलेल्या आईईडी स्फोटात 10 जवान शहीद झाले. तर एका चालकाचाही मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर आता हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. स्फोटानंतरचा हा व्हिडिओ आहे. स्फोटानंतर 'उड गया, पुरा उद गया' असं जवान या व्हिडीओत बोलताना ऐकू येत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटानंतर रस्त्यावर सुमारे 10 फूट खोल खड्डा झाला.

Dantewada IED Blast
Mallikarjun Kharge On PM Modi: पंतप्रधान मोदी विषारी सापासारखे; मल्लिकार्जुन खरगेंची टोकाची टीका

दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूरहून डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टरच्या दिशेने जवानांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता. या घटनेचे साक्षीदार असलेल्या या जवानांनी सांगितलं की, जवानांची गाडी अरनपूर पोलीस स्टेशन परिसरात येताच पहिल्या गाडीचा स्फोट झाला. त्यानंतर तातडीने मागील गाड्यांमध्ये जवान पोझिशन घेत जंगलाच्या दिशेने गोळीबार सुरु केला. (Latest News)

Dantewada IED Blast
Chhattisgarh Naxal Attack: स्फोटामुळे झाला भलामोठा खड्डा, जीप झाली जळून खाक! छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्याचा व्हिडीओ आला समोर

प्रत्यक्षदर्शी जवानाने थरारक अनुभवाबद्दल सांगताना म्हटलं की, स्फोटानंतर रस्त्यावर जवानांचे मृतदेह आणि वाहनाचे विखुरलेले पार्ट्स दिसत होते. मला काहीच सूचत नव्हतं. जवानांची जवळपास 15 मिनिट जंगलाच्या दिशेने गोळीबार केला.

गेल्या अनेक वर्षांत नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यात डीआरजीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय अनेक नक्षलवादी नेते ज्यांनी हा मार्ग सोडला आहे, ते आता छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात डीआरजीमध्ये काम करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com