Car Accident CCTV: कार आणि बाइकचा भीषण अपघात, कारला धडकल्यानंतर बाईकस्वार हवेत उडाला, व्हिडिओ व्हायरल

Bike And Car Crash In Lucknow : लखनऊ येथील इंदिरा नगर भागात एक भीषण अपघात घडला आहे, ज्यात बाईकवरील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
car and bike accident in lucknow
car and bike accident in lucknowSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे कार आणि बाइकची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, समोरून येणारा बाइकस्वार उडून कारच्या दुसऱ्या बाजूला काही अंतरावर जाऊन पडला. त्यामुळे तो गंभीर जखमा झाला. हा भीषण अपघात एका घराबाहेरील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ही घटना १२ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी बाइकस्वार उपचारानंतर रुग्णालयातून घरी परतला असून तो आता पूर्णपणे सुरक्षित आहे, मात्र हा अपघात अंगाचा थरकाप उडाणारा होता. अपघातग्रस्त युवक रॅपीडोमध्ये कामाला असून तो वाहन चालवतो. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लखनऊमधील इंदिरानगर सेक्टर १३ परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे एक स्विफ्ट कार वळण घेत मुख्य रस्त्यावर येत असताना समोरून भरधाव वेगाने एक बाइक येत होती.

car and bike accident in lucknow
UP Crime: भयानक! विवस्त्र अवस्थेत आढळला दलित मुलीचा मृतदेह, कवटी फोडली, काढले डोळे

दुचाकीचा वेग जास्त असल्याने वळण घेणारी कार पाहून बाइकस्वार दुचाकीला ब्रेक लावू शकला नाही. त्यामुळे बाईकस्वार थेट कारला धडकला. धडकेनंतर बाइकस्वार हवेतून उडला आणि कारच्या. मागच्या बाजुला जाऊन पडला. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला. तर अपघातात बाइकलाही मोठे नुकसान झाले आहे.या घटनेबाबत इंदिरा नगर (लखनऊ) पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशीष पांडे यांनी सांगितले की, या अपघातात जखमी झालेला बाइकस्वार आता बरा आहे आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली

car and bike accident in lucknow
Mumbai Coastal Car Accident : भरधाव कार डिव्हायडवर आदळल्याने उलटली, पती-पत्नी गंभीर जखमी; मुंबईत भीषण अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाइकस्वार अभिजीत श्रीवास्तव अतिशय जोरात वाहन चालवत होता. तर कार ही कमी वेगात होती. दरम्यान या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यात दुचाकीस्वार भरधाव वेगात होता हे स्पष्ट दिसत आहे. जखमी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. आता बाइक चालवणारा पूर्णपणे ठणठणीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com