कचोरीसोबत कांदा न मिळाल्याने रस्त्यावरचं मुलीचा हैदोस! (पहा Video)

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका मुलीने प्रचंड गोंधळ घातला आहे.
कचोरीसोबत कांदा न मिळाल्याने रस्त्यावरचं मुलीचा हैदोस! (पहा Video)
कचोरीसोबत कांदा न मिळाल्याने रस्त्यावरचं मुलीचा हैदोस! (पहा Video)Twitter/@Saffron_smoke
Published On

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका मुलीने प्रचंड गोंधळ घातला आहे. व्हिडिओमध्ये मुलगी कचोरी वरून भांडत आहे, नंतर ती त्या कचोरी विकणाऱ्या माणसाला कानशिलात देखील लागवते. आणि जेव्हा तिला आणखी राग येतो तेव्हा सर्व सामानासह त्याची सायकल देखील लाथ मारून पडून देते. आता हे सर्व घडत आहे कारण कचोरी विक्रेत्याने मुलीला कचोरीसोबत काय तर कांदा दिला नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलगी कचोरी विक्रेत्याकडून कांद्याची मागणी करत असल्याचे दिसत आहे. विक्रेता सांगतो की, मॅडम कांदा संपला आहे, त्यामुळे तो मिळणार नाही. मुलीला या गोष्टीचा राग येतो आणि ती दुकानदाराला खूप सुनावते. दुसरीकडे, जेव्हा तिच्याकडे तो कचोरी खाल्याचे पैसे मागतो तेव्हा ती मुलगी अधिक चिडते आणि शिवीगाळ करू लागते.

पहा हा व्हायरल व्हिडिओ-

मुलगी भांडताना पाहून इतर काही जण तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. गरीबांना त्याचे पैसे द्यावेत असे ते सांगतात. पण रागाच्या भरात ती मुलगी कोणाचेच ऐकत नाही आणि त्यांच्याशी उलट बोलू लागते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की मुलगी तिच्या सायकलला जोरात लाथ मारते आणि विक्रेत्याच्या सर्व कचोरी आणि इतर साहित्य रस्त्यावर विखुरले जाते.

व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे किंवा मूळ आहे हे स्पष्ट नाही;

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून लोक त्या मुलीला ट्रोल करत आहेत. प्रत्येकजण त्या दुकानदाराला साथ देताना दिसत आहे. पण या व्हिडिओची वास्तविकता अद्याप माहित नाही. हा स्क्रिप्ट केलेला व्हिडिओ आहे की असे काही प्रत्यक्षात घडले आहे, याची पुष्टी झालेली नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com