Viral News: आंघोळीने केला घात; 67 वर्ष टाळलं अन् पहिल्यादा आंघोळ करताच जीव गेला, कारण...

IRNA वृत्तसंस्थेने मंगळवारी या व्यक्तीचा 94 व्या वर्षी मृत्यू झाल्याची माहिती दिली.
Twitter@Arab_Intel
Twitter@Arab_IntelSaam TV
Published On

Viral News : एका व्यक्तीने 67 वर्ष आंघोळ केली नाही आणि ज्या दिवशी आंघोळ त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. इराणमध्ये ही विचित्र घटना समोर आली आहे. जगातील सर्वात व्यक्ती (World’s dirtiest man) म्हणून या व्यक्तीची ओळख होती.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, इराणचा (Iran) रहिवासी असलेला अमो हाजी हा संपूर्ण जगात जगातील सर्वात अस्वच्छ व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता. IRNA वृत्तसंस्थेने मंगळवारी या व्यक्तीचा 94 व्या वर्षी मृत्यू झाल्याची माहिती दिली. टाईम्स नाऊसह इतर मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने 67 वर्षांपासून आंघोळ केली नव्हती. (Latest News Update)

Twitter@Arab_Intel
High Court : पुराव्याशिवाय नवऱ्याला दारूडा म्हणणे क्रूरता; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

आंघोळ न करण्यामागे कारण काय?

सुमारे 7 दशकांपासून आंघोळ न करण्यामागे त्या व्यक्तीची एक विचित्र भीती होती. त्याला पाण्याची भीती वाटत होती आणि चुकून कधी अंघोळ केली तर आजारी पडेल असे त्याला वाटत होते. या व्यक्तीची ती भीती कदाचित बरोबर होती. कारण वृत्तानुसार, दक्षिणेकडील फार्स प्रांतातील देगाह गावात रविवारी या व्यक्तीचं निधन झालं आणि याला कारणही आंघोळ ठरलं आहे.

काही महिन्यांपूर्वी गावातील लोकांनी त्याला बाथरूममध्ये नेले आणि एकत्र आंघोळ घातली. मात्र त्यानंतर त्याची प्रकृती ढासळू लागली. पहिल्यांदा आंघोळ केल्यावर आजारी पडू लागला आणि त्याचा मृत्यू झाला. इराणी मीडियानुसार, 2013 मध्ये त्याच्यावर "द स्ट्रेंज लाइफ ऑफ अमो हाजी" नावाचा डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली होती.

Twitter@Arab_Intel
Bollywood Diwali Party: दिवाळी पार्टीतील सारा-जान्हवी आणि अनन्याचे इनसाईड फोटो, पाहा

त्याच्याबद्दल अधिक माहिती देताना तेहरान टाईम्सच्या अहवालात असे म्हटले आहे की, त्याला मृत प्राण्यांचे मांस खायला आवडायचे आणि सिगारेटचा पाईप देखील ओढायचा, परंतु तंबाखूऐवजी तो त्यात वाळलेल्या प्राण्यांची विष्ठा टाकत असे. लहान वयातच त्याने वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास पाहिला होता, ज्यामुळे त्याने स्वतःला जगापासून वेगळे करण्याचा विचार केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com