Electricity Bill: ९० वर्षीय आजीला वीज कंपनीचा कडक शॉक! झोपडीत फक्त २ बल्ब अन् बिल तब्बल १ लाख; आकडा ऐकताच..

1 lakh rs Electricity Bill: या आजीला दर महिन्याला ७० ते ८० रुपये इतकं बिल येते. मात्र यावेळी तब्बल १ लाख ३ हजार १५ रुपयांचं बिल आल्याने खळबळ उडाली आहे.
Electricity Bill News
Electricity Bill NewsSaamtv
Published On

Karnataka Bhagyanagar News: अलिकडच्या काळात महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यात महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे अनेकदा विजेची बिले वाढून आल्याचीही अनेक प्रकरणे पाहायला मिळतात. मात्र कर्नाटकमधील एका आजीला वीज कंपनीने असा काही धक्का दिला जो ऐकून तुम्हीही चक्रावून जालं.

या झोपडीत राहणाऱ्या आजीला कंपनीने तब्बल १ लाखाचे बिल पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे बील सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत.

Electricity Bill News
Nitin Gadkari News: 'सत्य मांडण्याची पत्रकारांना किंमत मोजावी लागते..' केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकमधील भाग्यनगर या ठिकाणी ही गिरिजम्मा नावाची ९० वर्षांची आजी राहाते. या आजीच्या घरात घरात फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, कॉम्प्युटर अशी कुठलीही उपकरणे नाहीत. तिच्या घरात दोनच बल्ब आहेत. असे असताना या महिलेच्या घरातील विजेचे बील एका लाखांपेक्षा जास्त आल्याने चर्चा रंगली आहे.

1 लाखाचं बील...

या आजीला दर महिन्याला फार- फार ७० ते ८० रुपये इतकं बिल येते. मात्र यावेळी तब्बल १ लाख ३ हजार १५ रुपयांचं बिल आल्याने आजीसह या गावातही खळबळ उडाली आहे. या बीलाची रक्कम ऐकून चक्करच आली. यानंतर तात्काळ वीज कंपनीला याबद्दल माहिती देवून चौकशी केली. (Latest Marathi News)

Electricity Bill News
Chandrapur Accident: भरधाव जीपचा टायर फुटून ट्रकला धडकली; भीषण अपघातात दोन सख्खे भाऊ, सख्ख्या जावांचा मृत्यू

फोटो व्हायरल...

यामध्ये मीटर रिडिंग करायला आलेल्या कर्मचाऱ्याने आकडे लिहिताना घोळ केल्याने हे बील चुकल्याचे लक्षात आले. ज्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी घराची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले आहे. दरम्यान, या बिलाचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत असून नेटकरीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com