उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामागे राजकारण?सरकार आणि धनखडांमध्ये कुठे पडली ठिणगी?

Vice President Jagdeep Dhankhar: संसदेचं अधिवेशन सुरु असतानाच उपराष्ट्रपती जगदीप धनखडांच्या राजीनाम्याने खळबळ उडालीय... मात्र राजीनाम्याच्या आधी नेमकं काय घडलं? उपराष्ट्रपतींचा राजीनामा प्रकृती अस्वस्थ्यामुळे की राजकारणामुळे?
Vice President Jagdeep Dhankhar resigns unexpectedly; speculation mounts over political reasons behind his sudden move.
Vice President Jagdeep Dhankhar resigns unexpectedly; speculation mounts over political reasons behind his sudden move.Saam Tv
Published On

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देत तडकाफडकी राजीनामा दिला...एवढंच नाही तर निरोप समारंभाच्या कार्यक्रमालाही धनखड उपस्थित राहणार नसल्याचं समोर आलंय... त्यामुळेच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली... मंगळवारी राजीनामा देणाऱ्या धनखड यांची तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर तर्कवितर्क लढवले जात आहेत. संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत विरोधकांशी संभाषण करणाऱ्या धनखड यांच्यासोबत एका तासात नेमकं काय घडलं की त्यांना राजीनामा द्यायला लागला, असा सवाल काँग्रेसने केलाय.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनखड राज्यसभेत उपस्थित

विरोधकांच्या गदारोळामुळे दुपारी 12.30 वा. कामकाज सल्लागार समितीची बैठक

दुपारी 4 वा.

विरोधकांचा न्यायमुर्ती वर्मांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारला

चर्चेनंतर पुन्हा 4.30 वा. धनखडांच्या अध्यक्षतेखाली बैठक

बैठकीला मंत्री रिजेजू आणि जे. पी नड्डांची दांडी

संध्याकाळी पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांची बैठक झाली

त्यानंतर अमित शाह, राजनाथ सिंहांची मंत्र्यांसोबत आणखी एक बैठक

दोन्ही बैठका न्या. वर्मांच्या महाभियोगासंदर्भात असल्याची चर्चा

याच बैठकीनंतर धनखड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा

ठाकरे गटानेही यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. सभागृहात नड्डांनी सभापतींचे अधिकार हाती घेतल्यानेच त्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता खासदार राऊतांनी व्यक्त केलीय.. खरंतर जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ प्रचंड वादळी आणि वादग्रस्त ठरलाय... त्यातच पावसाळी अधिवेशनात न्यायमुर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात लोकसभेत नोटीस देण्यात आली... तर राज्यसभेत मात्र सत्ताधाऱ्यांच्या आधीच विरोधकांनी महाभियोगाची नोटीस दिली... ही नोटीस सभापती धनखड यांनी स्वीकारली... त्यामुळे सरकारला श्रेय न घेता आल्याने सरकार आणि जगदीप धनखड यांच्यात ठिणगी पडली आणि त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता वर्तवली जातेय....

त्यामुळे जगदीप धनखड यांचा राजीनामा दिल्लीतील सत्ताकेंद्राशी बिनसल्यामुळे की खरंच प्रकृतीच्या कारणास्तव यामागचं सत्य लवकरच समोर येईलच...आगामी उपराष्ट्रपती कोण असणार आणि सप्टेंबर नंतर मोदींच्या पच्याहत्तरीनंतर दिल्लीच्या वर्तुळात काय घडामोडी घडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com