भाजप आणि इंडिया आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सी पी राधाकृष्णन यांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोनाफोनी केला..मात्र शरद पवारांनी विचारांचा दाखला देत फडणवीसांच्या विनंतीला नकार दिलाय..
दुसरीकडे ठाकरे सेनेनं भाजप उमेदवाराला पाठींबा देणं दूरच उलट इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डींना पाठींबा जाहीर करत एनडीएचीच मतं फुटण्याचा इशारा दिलाय...
खरंतर उपराष्ट्रपती पदासाठी राज्यसभा आणि लोकसभेतील खासदार मतदान करत असतात.. हे मतदान गुप्त पद्धतीने होत असतं.. मात्र सध्याचं पक्षीय बलाबल काय आहे? पाहूयात...
1 जागा रिक्त असल्यानं लोकसभेत खासदारांची संख्या 542 आहे... त्यात भाजपचे 240 एनडीएचे 292, तर इंडिया आघाडीचे 234 खासदार आणि इतर पक्षांचे 17 खासदार आहेत..
राज्यसभेत 245 पैकी 12 सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित आहेत त्यांना वगळून एनडीए समर्थक 128 तर इंडिया आघाडीचे 105 खासदार आहेत.. विजयासाठी 393 मतांचं बहुमत अपेक्षित आहे..तर
दोन्ही सभागृहात मिळून एनडीएकडे 420 तर इंडिया आघाडीकडे 339 मतं आहेत.
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएने व्यंकय्या नायडूंचं नाव घोषित केलं.. तेव्हा प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या सगळ्या पक्षांनी त्यांना समर्थन दिलं होतं.. आता तेलंगणाच्या बी सुदर्शन रेड्डींना उमेदवारी देऊन काँग्रेसने चंद्रबाबू आणि वायएसआर रेड्डींची तर सी पी राधाकृष्ण यांना उमेदवारी देऊन भाजपने 22 खासदार असलेल्या स्टॅलिन यांची कोंडी केलीय.....दरम्यान संजय राऊतांनी क्रॉस व्होटिंग होणार असल्याचा खळबळजनक दावा केलाय. त्यासंदर्भात काय शक्यता आहे? पाहूयात...
चंद्रबाबू नायडूंचे 16 तर वायएसआर रेड्डींचे 4, एमआयएमचा 1 तर जनसेवा पार्टीचे 2 खासदार आहेत.. आणि भाजपवर नाराज असलेल्या 13 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यास सीपी राधाकृष्ण यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.आकड्यांच्या खेळात सीपी राधाकृष्णन यांचं पारडं जड दिसतय.. त्यामुळे 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राधाकृष्णन बाजी मारण्याची शक्यता आहे... मात्र इंडिया आघाडीने प्रादेशिक अस्मिता आणि वैचारिक मुद्द्यावर मतांची जुळवाजुळव केली तर भाजपसाठी हा विजय आव्हानात्मक असणार हे मात्र निश्चित..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.