
वाराणसी हे देशातील पहिले शहर ठरणार जिथे रोपवे सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरला जाणार.
बनारस कॅन्ट स्टेशन ते गोदौलिया चौक (३.७५ किमी) मार्गावर रोपवे धावणार.
प्रवास वेळ ५० मिनिटांवरून १५ मिनिटांवर येणार.
प्रकल्पावर ८०७ कोटींचा खर्च. चार स्टेशनांवर आधुनिक सुविधा.
उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहर पुन्हा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. वाराणसी हे देशातील पहिले शहर असणार आहे ज्याठिकाणी रोपवे सार्वजनिक वाहतुकीचे काम करणार आहे. भारतामध्ये आतापर्यंत रोपवेचा वापर टूरिस्ट स्पॉट आणि धार्मिक स्थळांवर केला जातो. पण आता देशात पहिल्यांदाच रोपवे हे अर्बन पब्लिक ट्रान्सपोर्ट बनवले जात आहे. या रोपवे सार्वजनिक वाहतुकीमुळे काशीमधील नागरिकांची ट्रॅफिकमधून सुटका होणार आहे आणि त्यांचा प्रवास सुसाट होणार आहे.
वाराणसीमधील नागरिकांची ट्रॅफिकमधून सुटका करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अनोखा मार्ग बनवला आहे. वाराणसीमधील नागरिक आता रोपवेच्या माध्यमातून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत. वाराणसीमधील नागरिकांची ट्रॅफिकमधून सुटका करण्यासाठी आणि प्रवास सुलभ व्हावा यासाठी रोपवे सार्वजनिक वाहतूक म्हणून तयार केले जात आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना याचा फायदा होणार आहे.
वाराणसीमध्ये रोपवे बांधण्यासाठी एकूण ८०७ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ही रोपवे सेवा बनारस कॅन्ट रेल्वे स्टेशन ते गोदौलिया चौकापर्यंत असणार आहे. हा रोपवे ३.७५ किमी लांबीचा असणार आहे. या रोपवेमुळे बनारस कॅन्ट रेल्वे स्टेशन ते गोदौलिया चौकापर्यंत जाण्यासाठी फक्त १५ मिनिटं लागणार आहेत. आधी वाहतूक कोंडीमुळे या प्रवासासाठी नागरिकांना ४५ ते ५० मिनिटं लागायची.
ही रोपवे वाराणसीमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवाशांना आधुनिक सुविधा देईल. रोपवेसाठी ४ स्थानके बांधली जात आहेत. कॅन्ट रेल्वे स्टेशन, गौदालिया चौराहा, रथयात्रा आणि विद्यापीठ ही चार स्थानके असणार आहेत. या चारही स्थानकांचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या स्थानकांमध्ये स्वयंचलित जिने, लिफ्ट, व्हीलचेअर रॅम्प, शौचालये, पार्किंग आणि अन्न-पाण्याची सोय केली जाणार आहे.
सुमारे १५० ट्रॉली कार ४५-५० मीटर उंचीवर चालतील. प्रत्येक ट्रॉली कार १० प्रवाशांना वाहून नेण्यास सक्षम असतील. ट्रॉली कार १.५ ते २ मिनिटांच्या अंतराने येतील. ज्यामुळे वाहतुकीचा सतत प्रवाह राहील, असे अहवालात म्हटले आहे. ही प्रणाली दररोज १६ तास चालण्यासाठी डिझाइन केलेली आहे. या रोपवेचे भाडे अद्याप निश्चित करण्यात आले नाही. पण हे भाडे नागरिकांना परवडेल असेच असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.