असंवेदनशील! पोलिसांची कडेवर लेकरु घेतलेल्या बापाला काठीने मारहाण...(पहा व्हिडिओ)

उत्तर प्रदेश मधील कानपूर येथे यूपी पोलिसांच्या क्रूरतेचा व्हिडिओ समोर आला
असंवेदनशील! पोलिसांची कडेवर लेकरु घेतलेल्या बापाला काठीने मारहाण...(पहा व्हिडिओ)
असंवेदनशील! पोलिसांची कडेवर लेकरु घेतलेल्या बापाला काठीने मारहाण...(पहा व्हिडिओ)Saam Tv
Published On

वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश (uttar pradesh) मधील कानपूर (kanpur ) येथे यूपी (UP)पोलिसांच्या क्रूरतेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या कडेवर लहान मूल असताना देखील पोलिसांकडून (police)त्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. लहान मूल जोराने रडत आहे, तरी देखील कर्मचारी लाठ्या मारणे थांबवल नाही. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाल्यावर आरोपी चांगलीच तंबी देण्यात आली आहे. (uttar pradesh kanpur police beaten person video viral with child in arms)

पहा व्हिडिओ-

सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कानपूरच्या ग्रामीण भागामधील असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप नेते आणि खासदार वरुण गांधी यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत वरुण गांधी म्हन्स्ले आहेत की, 'मजबूत कायदा आणि सुव्यवस्था दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी असते. पण, न्याय मागणाऱ्यांवरच अत्याचार होत आहे. (uttar pradesh kanpur police beaten person video viral with child in arms)

भक्कम कायदा आणि सुव्यवस्था अशी असते जिथे पोलिसांचा नाही तर कायद्याचा धाक आपल्याला असतो. हे दृष्य अत्यंत क्लेशदायक आहे', असे ते यावेळी सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला पोलिसांकडून लाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. यादरम्यान तो विनवणी करत होता की, मारू नका मुलाला लागेल. पण, पोलीस कर्मचारी थांबतच नव्हता आणि त्याला मारहाण सुरुच होती.

असंवेदनशील! पोलिसांची कडेवर लेकरु घेतलेल्या बापाला काठीने मारहाण...(पहा व्हिडिओ)
पेट्रोलचे थेंब अंगावर उडल्याने वाद, पंपावर महिलांमध्ये हाणामारी, VIDEO VIRAL

थोड्या वेळानंतर त्याच्या कडेवर असलेल्या मुलाला पोलीस जबरदस्तीने हिसकाऊन घेतात आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर यूपी पोलिसांवर टीकेची झोड चांगलीच उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या शेजारी खोदकाम सुरू आहे. यादरम्यान माती उडून रुग्णालयात जात आहे. या खोदकामाचा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून विरोध सुरू होता.

कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाचे गेट देखील बंद केले होते. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण, काही कर्मचारी ऐकयला तयार नव्हते. अशात पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला, यादरम्यान रजनीश शुक्ला पोलिसांच्या हाती सापडला. तोही या विरोध प्रदर्शनात सामील होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com