UP Crime News: वकीलाच्या वेशात आला अन् गॅंगस्टरला संपवलं; लखनौ कोर्टातील घटनेने खळबळ

वकीलाच्या वेशात आला अन् गॅंगस्टरला संपवलं; लखनौ कोर्टातील घटनेने खळबळ
UP Crime News
UP Crime NewsSaam TV
Published On

Lucknow Court Firing: उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. कुख्यात गुन्हेगार संजीव माहेश्वरी (Sanjeev Jiva) उर्फ ​​जीवा याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लखनौ कोर्टाच्याच्या (Lucknow Court) आवारात ही घटना घडली आहे.

या गोळीबाराच्या घटनेत जीवावर अनेक वेळा गोळ्या झाडल्या गेल्याचं समजतं आहे. या घटनेत अन्य दोन जणांना देखील गोळ्या लागल्या आहेत. हल्लेखोर वकिलाच्या वेशात पोहोचला होता. हल्लेखोराला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

UP Crime News
Nilesh Rane Tweet On Sharad Pawar: औरंगजेबाशी तुलना! शरद पवारांबद्दल बोलताना निलेश राणेंचा तोल सुटला; ट्विट व्हायरल..

मिळालेल्या माहितीनुसार, संजीव जीवाचे मुख्तार अन्सारी आणि मुन्ना बजरंगी गँगशी संबंध होते. आमदार कृष्णानंद राय आणि ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येत संजीव जीवाचं नाव समोर आलं होतं. मात्र कृष्णानंद राय यांच्या हत्येप्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता झाली.  (Latest Auto News in Marathi)

संजीव हा पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा गुन्हेगार असल्याचे सांगितले जाते. त्याला काही दिवस लखनौ तुरुंगात ठेवण्यात आले होते. येथूनच त्याला एका खटल्यात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. मुन्ना बजरंगीच्या हत्येनंतरच संजीव माहेश्वरीने आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं.

UP Crime News
Kolhapur Protest Update: आक्षेपार्ह पोस्टमुळे कोल्हापूरात आंदोलन चिघळलं, इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद

भाजपचे माजी मंत्री ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येतही जीवाचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. १० फेब्रुवारी १९९७ रोजी लोहाई रोड येथे द्विवेदी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने लखनौ न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. १७ जुलै २००३ रोजी सीबीआय कोर्टाने माजी आमदार विजय सिंह आणि शूटर संजीव माहेश्वरी उर्फ ​​जीवा या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com