US Helicopter Crash: अमेरिकेच्या सैन्यदलाचे २ हेलिकॉप्टर कोसळले; ९ सैनिकांचा दुर्दैवी मृत्यू

US Helicopter Crash latest News : अमेरिकेच्या केंटुकी येथे प्रशिक्षणादरम्यान अमेरिकेच्या सैनिकांचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे.
US Helicopter Crash latest News
US Helicopter Crash latest NewsANI/Twitter

US Helicopter Crash News : अमेरिकेतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. अमेरिकेच्या केंटुकी येथे प्रशिक्षणादरम्यान अमेरिकेच्या सैनिकांचे २ हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत ९ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

अमेरिकेत सैन्यदलाचं २ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना बुधवारी रात्री रात्री १० वाजण्याच्या (0300 GMT) सुमारास घडली आहे. सैन्यदलाचे प्रवक्ते यांनी माहिती दिली आहे की, दोन्ही हेलिकॉप्टर हे १०१ हवाई (एयरबॉर्न) विभागाचे होते. या विभागाचे प्रवक्ते अँथनी होफलर यांनी ९ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. (Latest International Marathi News)

फोर्ट कँपबेल येथील उत्तर-पश्चिमच्या केंटुकीच्या ट्रिग काउंटी येथे क्रू मेंबर एका प्रशिक्षणादरम्यान 'HH60 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर' उडवत होते.याचदरम्यान, दुर्दैवी घटना घडली. या घटनेबद्दल अधिक माहिती घेतली जात आहे.

केंटुकीचे राज्यपाल अँडी बेशियार यांनी ट्विट केले की, 'काल रात्री घडलेली घटना दु:खद आहे. या दुर्दैवी घटनेनंतर ९ मृत सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांसाठी फोर्ट कँपबेलला निघालो आहे'.

US Helicopter Crash latest News
Philippines Boat Fire News: फिलीपीन्समध्ये प्रवाशांनी भरलेल्या भलामोठ्या जहाजाला आग, ३१ जणांचा मृत्यू, ७ प्रवासी बेपत्ता

अँडी बेशियार यांनी आधीच्या ट्विटमध्ये म्हटले की, केंटुकी पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. कृपया करून आपण सर्वांनी दुर्घटनेतील सैनिकांसाठी प्रार्थना करा'. दरम्यान, अमेरिकीतील या दुर्दैवी घटनेनंतर अमिरेकीतील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com