UPSC Topper Ishita Kishore Mock Interviews: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 933 उमेदवारांचं सिलेक्शन केलं आहे. यंदाच्या वर्षी निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
इशिका किशोर हिने UPSC परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. दैदिप्यमान कामगिरी केल्यानंतर इशिताने म्हटलं की, मला यशाची पूर्ण अपेक्षा होती. मी देशात पहिली येईल असं वाटलं नव्हतं. हा माझ्या अत्यंत सुखद धक्का आहे.
इशिताने दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्र विषयात शिक्षण घेतलं आहे. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अव्वल ठरलेल्या इशिता किशोरला भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) काम करण्याची इच्छा आहे. (Latest Marathi News)
2529 उमेदवारांनी दिली होती मुलाखत
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखती 18 एप्रिलपर्यंत चालल्या होत्या. 30 जानेवारीपासून मुलाखतीची फेरी सुरू झाली होती. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या सुमारे 2,529 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.