RPN Singh Resigns: उत्तर प्रदेशात काँग्रेसला झटका, आरपीएन सिंग यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची शक्यता

काँग्रेसचे बडे नेते आरपीएन सिंग यांनी काँग्रेसचा हात सोडत राजीनामा दिलाय.
RPN Singh Resigns
RPN Singh ResignsSaam Tv
Published On

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. काँग्रेसचे (Congress) बडे नेते आरपीएन सिंग (RPN Singh) यांनी काँग्रेसचा हात सोडत राजीनामा दिलाय. आज ते भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. याबाबतच्या बातम्या गेल्या काही काळापासून येत होत्या. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झालं असून आरपीएन सिंग यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे (UP Election 2022 Congress leader RPN Singh resigns from the Congress party may join BJP).

RPN Singh Resigns
Nitin Raut : "राज्य अंधारात गेलं तर केवळ काँग्रेस जबाबदार नसेल", नितीन राऊत

भाजप (BJP) आरपीएन सिंग (RPN Singh) यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात कुशीनगरातील पडरौना येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजीनामा दिल्यानंतर आरपीएन सिंग यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरील माहितीही बदलली आहे. त्यांनी काँग्रेसशी (Congress) संबंधित त्यांची माहिती हटवली आहे. तसेच, त्यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्याचंही ट्विट केलं आहे. "आज, जेव्हा संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची तयारी करत आहे, तेव्हा मी माझ्या राजकीय जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे", असं ट्विट त्यांनी केलं.

भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा

आरपीएन सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबतच्या चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. जर त्यांनी भाजपात प्रवेश केला तर भाजप त्यांना कुशीनगरातील पडरौना येथून स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात तिकीट देऊ शकते.

आरपीएन सिंह हे मागास जातीतील सैंथवार-कुर्मी आहेत. पूर्वांचलमध्ये सैंथवार जातीची लोकसंख्या मोठी आहे. कुशीनगर, गोरखपूर, देवरिया हे विशेष भाग यात आहेत. पूर्वांचलमध्येही आरपीएन सिंग यांची मजबूत पकड आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com