Rajasthan News : आश्चर्य! 4 पाय आणि 4 हातांचं बाळ, पुढच्या 20 मिनिटांत जे घडलं ते...

Unique Baby Born in Rajasthan : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. जे पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत.
Baby
Baby Saam Tv

Rajasthan Unique Baby News : सामान्यत: माणसाला दोन हात आणि दोन पाय असतात. मात्र राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. जे पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. चुरू येथील एका रुग्णालयात चक्क चार पाय आणि चार हात असलेल्या मुलीचा जन्म झाला. मात्र प्रसूतीनंतर अवघ्या 20 मिनिटांनी या बाळाचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

Baby
Sangli News : मिरजेत रेकॉर्डवरील गुन्हेगारावर खुनी हल्ला; पोलिसांनी ४ संशयीताना घेतले ताब्यात

या बाळाचा जन्म रतनगडच्या गंगाराम रुग्णालयात झाला. राजलदेसर शहरातील एका महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. प्रसूतीदरम्यान महिलेने असामान्य नवजात बाळाला जन्म दिला. त्याला चार हात आणि चार पाय होते. होळीच्या (Holi) एक दिवसाआधी अशा मुलीच्या जन्मा झाला. या बाळाबाबत समजताच लोकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. 

Baby
Sangali Crime : मित्रानेच केला घात; अपहरण करत केली निर्घृण हत्या;पुढे मृतदेहाचं जे केलं ते काळजाचा थरकाप उडवणारं

20 मिनिटांनी मृत्यू

नवजात जन्माच्या वेळी श्वास घेत होते. मात्र सुमारे 20 मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की, राजलदेसर येथील महिला ५ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या रुग्णालयात आली होती. तिच्या सोनोग्राफीमध्ये बाळाला दुहेरी हृदय असल्याचे निरादशनास आले. या मुलीच्या जन्माची बातमी संपूर्ण जिल्ह्यात आगीसारखी पसरली. या असामान्य बाळाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. पण, जन्मानंतर सुमारे 20 मिनिटांनी नवजात बाळाचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com