काकाने अपहरण करुन 11 वर्ष केला बलात्कार; लग्न न केल्यास अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

जेव्हा जेव्हा ती विरोध करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तिला बेदम मारहाण केली जाते.
काकाने अपहरण करुन 11 वर्ष केला बलात्कार; लग्न न केल्यास अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी
काकाने अपहरण करुन 11 वर्ष केला बलात्कार; लग्न न केल्यास अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी Saam TV
Published On

गाझियाबादच्या (Ghaziabad) मुरादनगरमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. मुलीच्या जवळच्या सख्ख्या मावस काकाने तिचे अपहरण करून 11 वर्षे तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडित मुलीने पोलीस ठाणे गाठून आपल्या काकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोबतच त्याच्यावर कडक कारवाईची मागणीही करण्यात केली आहे. पीडितेने शनिवारी पोलिस स्टेशन गाठले आणि प्रभारी सतीश कुमार यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 11 वर्षांपूर्वी ती शेतात चारा आणण्यासाठी गेली होती, तेव्हा तिच्या काकाने तिचे अपहरण केले होते. ही धक्कादायक घटना मुरादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे.

पीडितेचा आरोप आहे की, तिचा काका तिला बंधक बनवून गेल्या 11 वर्षांपासून सतत तिच्यावर बलात्कार करत आहे. जेव्हा जेव्हा ती विरोध करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तिला बेदम मारहाण केली जाते असे, असे मुलीचे म्हणणे आहे. तसेच अनेक दिवस खोलीत बंद करून तिला जेवणही दिले जात नव्हते. पीडितेचा आरोप आहे की, आरोपी काकाला तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचे होते. मुलीने त्याच्याशी लग्न केले नाही तर तिच्या तोंडावर अॅसिड टाकेन, अशी धमकी आरोपीने दिली होती.

काकाने अपहरण करुन 11 वर्ष केला बलात्कार; लग्न न केल्यास अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी
Year Ender 2021: खेळाच्या मैदानातील वादंग; 'हे' हिरो ठरले व्हिलन

सख्ख्या काकावर अपहरणाचा आरोप

पीडित मुलीने सांगितले की, तिने मोठ्या कष्टाने आपल्या काकाच्या तावडीतून सुटका करून दिल्लीला (New Delhi) पळ काढला. तिथे तिला तिचा भाऊ भेटला. बहिणीला पाहताच भावाने तिला ओळखले. त्यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांना हे सर्व सांगितले. कुटुंबीयांच्या संमतीने तिने काकाविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस (Police) स्टेशन गाठले आहे. मुलीने आरोप केला आहे की तिच्या वडिलांसमान काकाने तिचे अपहरण केले आणि 11 वर्षे तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या विरोधात आवाज उठवल्याने तिला बेदम मारहाण करण्यात आली. अनेक दिवस तिला जेवणही दिले गेले नाही. त्या अत्याचाराने ती खूप अस्वस्थ झाली होती.

पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी

बलात्कारातला आरोपी तरुणीवर लग्नासाठी सतत दबाव टाकत होता. ज्यासाठी पीडिता अजिबात तयार नव्हती. त्यानंतर आरोपींनी त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला होता. संधी मिळताच पीडित तरुणी आरोपीच्या तावडीतून सुटून दिल्लीला पळून जाण्यात यशस्वी झाली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com