UAE: अबुधाबी विमानतळाजवळ ड्रोन हल्ला, दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू !

येमेनच्या हुथी बंडखोरांनी जबाबदारी घेतली
UAE Abu Dhabi Airport Attack
UAE Abu Dhabi Airport AttackTwitter/@ANI
Published On

Abu Dhabi Airport Attack: येमेनच्या हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. याबद्दल अबुधाबी पोलिसांनी माहिती दिली आहे की, मुसाफा परिसरात बंडखोरांनी हल्ला केला. या भागातील तीन ऑईल टँकरवर (Oil Tanker) ड्रोनने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर तेलाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट झाला. माहितीनुसार, या स्फोटाची आग अबुधाबी (Abu Dhabi) विमानतळापर्यंत पोहोचली. या हल्ल्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर सहा जण जखमी झाले आहेत. (UAE Abu Dhabi Airport Attack news)

तर, ही घटना सोमवारी सकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. एका वृत्तसंस्थेनुसार अबू धाबी पोलिसांनी सांगितले की, ड्रोनमधून तेल टँकरवरील स्फोट इतका जोरदार होता की, ती आग अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Abu Dhabi International Airport) नवीन सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाण पर्यंत पसरली गेली. मात्र, या स्फोटामुळे विमानतळावर कोणतीही हानी झालेली नाही. स्थानिक मीडियानुसार, येमेनच्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

UAE Abu Dhabi Airport Attack
Photos: सारा तेंडुलकरचा गोव्यात Sunset Walk...

दुबईच्या अल-अरेबिया या वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन भारतीय नागरिक तसेच एक पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. (Three killed in UAE fuel truck blast)

अबू धाबी पोलिसांनी सांगितले की, स्फोटापूर्वी आकाशात ड्रोन दिसल्याचेही वृत्त समजले होते. अबुधाबीमध्ये दोन ठिकाणी आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. पहिली आग मुसाफा येथे तेल टँकरवर झाली, तर दुसरी आग अबू धाबी विमानतळाच्या बांधकामाच्या ठिकाणी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com