जन्मजात बाळाला दोन डोके; पालकांनीच काढला रुग्णालयातून पळ !

दोन डोकं असलेलं बाळ जन्माला आल्याने ही जन्मदाती आई-वडील रुग्णालयातून पळून गेले आहेत, अशी माहिती देण्यात येत आहे.
जन्मजात बाळाला दोन डोके; पालकांनीच काढला रुग्णालयातून पळ !
जन्मजात बाळाला दोन डोके; पालकांनीच काढला रुग्णालयातून पळ !Saam Tv

रांची : झारखंडच्या (Jharkhand) रिम्समधून RIMS एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील रुग्णालयात एका बाळाचा जन्म होतो परंतु त्याला दोन डोके होते, त्या बाळाचे निर्दयी जन्मदाते आपल्या नवजात बाळाला जन्म देऊन चक्क पळून गेले आहेत. दोन डोकं असलेलं बाळ जन्माला आल्याने ही जन्मदाती आई-वडील रुग्णालयातून पळून गेले आहेत, अशी माहिती देण्यात येत आहे.

हे देखील पहा-

डॉक्टरांनकडून सांगितले गेले की, मुलाला जन्मापासूनच ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल (Occipital Meningo Encephalocele) या आजाराने ग्रासले आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, या आजारात डोक्याचा मागचा भाग बाहेर येऊन थैलीसारखा होऊन तो दोन डोक्यांसारखा दिसतो. तसेच हा भाग मेंदू आणि त्वचेलाही जोडलेला असतो.

बाळाला घरातील कुटुंबीयांनी गुपचूप सोडून काढला पळ;

आपल्या बाळाला तसे पाहून घरातील कुटुंबीयांनी त्याला रिम्समध्येच सोडले आणि गुपचूप तेथून पळ काढला. याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधला, परंतु तपासात पत्ता बनावट असल्याचे समोर आले. मात्र, त्या निरपराध बाळाला डॉक्टरांच्या टीमने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. आता डॉक्टरांनी चालवलेली एनजीओ NGO त्या बाळाची काळजी घेत आहे.

जन्मजात बाळाला दोन डोके; पालकांनीच काढला रुग्णालयातून पळ !
कोळसा खाणीत भीषण स्फोट; आगीमुळे 52 कामगारांचा जळून मृत्यू!

ऑपरेशननंतर बाळाच्या डोक्यातील अतिरिक्त भाग काढून टाकला;

RIMS रुग्णालयातील न्यूरो सर्जरी विभागाचे डॉक्टर म्हणाले, "डॉक्टरांच्या टीमने दोन तासांच्या ऑपरेशननंतर Operation बाळाच्या डोक्यातील अतिरिक्त भाग काढून टाकला. त्यामुळे पुढचे 3 दिवस ते नवजात बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बाळावर मोठी शस्त्रक्रिया झाली आणि त्याला वाचवण्यात यश आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com