कोळसा खाणीत भीषण स्फोट; आगीमुळे 52 कामगारांचा जळून मृत्यू!

रशियातील सायबेरियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. केमेरोवो भागातील कोळसा खाणीत लागलेल्या आगीत ५२ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
कोळसा खाणीत भीषण स्फोट; आगीमुळे 52 कामगारांचा जळून मृत्यू!
कोळसा खाणीत भीषण स्फोट; आगीमुळे 52 कामगारांचा जळून मृत्यू!Saam Tv

Russia: रशियातील सायबेरियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. केमेरोवो भागातील कोळसा खाणीत लागलेल्या आगीत ५२ कामगारांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मिळत आहे. यात सहा बचावकर्त्यांचा देखील समावेश आहे. पाच वर्षांतील हा सर्वात प्राणघातक खाण अपघात असल्याचं मानलं जातं आहे. रशियन न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आल्याप्रमाणे, Listvyazhnaya Mine खाणीत वाचलेल्या कोणत्याही व्यक्तीला वाचवण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे अजूनही अनेक मृतदेह आतमध्ये आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अद्याप सुरु आहेत.

हे देखील पहा-

यापूर्वी कोळशाच्या धुरामुळे ११ खाण कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. ते २५० मीटर खोलीवर काम करत होते (Russia Mine Incident). स्थानिक प्रशासनाचे सांगितलं आहे की, ३८ जणांना रुग्णालयात Hospitalized दाखल करण्यात आलं आहे. यापैकी, चार जणांची प्रकृती गंभीर आहे. तर बाकी १३ जणांना रुग्णालयात दाखल न करता उपचार करण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी भूमिगत २८५ लोक काम करत होते अशी माहिती आहे.

कोळसा खाणीत भीषण स्फोट; आगीमुळे 52 कामगारांचा जळून मृत्यू!
“तिन्ही पक्षात कोणीही ज्योतिरादित्य शिंदे नाही”; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला (Video)

मोठ्या स्फोटानंतर आग;

कोळसा खाणीत जोरदार स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागली आहे. हा स्फोट एवढा अचानक झाला की, त्यात लोकांना पळून जाण्याची संधी देखील मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच, बचावकर्ते आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देखील स्फोटात मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com