राहुल गांधींवर ट्विटरची कारवाई; 'ते ट्विट' डिलीट करत अकाउंट तात्पुरतं लॉक
राहुल गांधींवर ट्विटरची कारवाई; 'ते ट्विट' डिलीट करत अकाउंट तात्पुरतं लॉकSaam Tv News

राहुल गांधींवर ट्विटरची कारवाई; 'ते ट्विट' डिलीट करत अकाउंट तात्पुरतं लॉक

ट्विटरने कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर कारवाई केली आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या नोटीसीनंतर त्यांचे ते ट्विट डिलीट करत अकाउंट तात्पुरतं लॉक करण्यात आलं आहे.
Published on

नवी दिल्ली : दिल्ली येथील नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Delhi Rape Case) करुन तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी बलात्कार पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मात्र यावेळी बलात्कार पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेतल्याचे फोटो राहुल गांधींच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आले. याचप्रकरणी ट्विटर इंडियाने (Twitter India) राहुल गांधींवर कारवाई केली आहे. त्यांचे ते ट्विट डिलीट करत अकाउंट तात्पुरत्या स्वरुपात लॉक करण्यात आलं आहे. (twitter suspended rahul gandhis account temporary and delected controversial tweet)

हे देखील पहा -

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ (Protection of Children from Sexual Offences Act 2012 -Pocso Act, पॉक्सो कायदा) यानुसार बलात्कार पिडीतेचे नाव, फोटो किंवा ओळख पटेल अशी कोणतीही महिती प्रसारित करणे अवैध आहे. राहुल गांधीने पिडीतेच्या आई - वडिलांची भेट घेतली. मात्र या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले. या फोटोंमध्ये पिडीतेच्या आई - वडिलांचा चेहरा दिसत असल्याने बलात्कार पिडीतेची ओळख होऊ शकते. याबाबत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं ट्विटर इंडियाला नोटीस पाठवत राहुल गांधींचे ते ट्विट हटवण्यास सांगितले होते. त्यानुसारच राहुल गांधींचे हे ट्विट डिलीट करण्यात करुन त्यांचं अकाउंटही लॉक करण्यात आलं आहे. राहुल गांधींनी याबाबत अद्यापतरी काही प्रतिक्रीया दिलेली नाही, मात्र कॉंग्रेसने याबाबत माहिती देत राहुल गांधींचे अकाउंट पुर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. तसेच तोपर्यंत राहुल गांधी त्यांच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन जनतेशी संपर्कात असतील अशी माहिती कॉंग्रेसनं दिली आहे.

दरम्यान कॉंग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी याबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. “भाजपाने केलेल्या तक्रारीच्या आधारे राहुल गांधींचं ट्विटर खातं लॉक करण्यात आलं आहे. बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्याऐवजी भाजपा आणि मोदी सरकार ट्विटरला भीती दाखवण्यात व्यस्त असून राहुल गांधींचाही बेकायदेशीरपणे पाठलाग करत आहे. त्यांनी याच वेळेचा वापर पीडितेला न्याय देण्यासाठी केला असता तर दिल्ली आज एक सुरक्षित ठिकाण असतं,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.

राहुल गांधींवर ट्विटरची कारवाई; 'ते ट्विट' डिलीट करत अकाउंट तात्पुरतं लॉक
बलात्कारांनाही राजकीय पक्ष निर्माण झालेत

याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी राहुल गांधींची पाठराखण करत सामनाच्या (Saamana News Paper) अग्रलेखातून सरकारवर निशाणा साधला आहे.''दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. तिला नंतर मारून टाकले. राहुल गांधी त्या मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेले. तेव्हा भाजपने विचारले, ‘काँग्रेसशासित राज्यांत बलात्कार होत नाहीत काय?’ बलात्कारांना राजकीय पक्ष निर्माण झाले. हे प्रथमच घडत आहे! राहुल गांधी हे बलात्कारपीडितेच्या कुटुंबांना भेटले तो फोटो ट्विटरवरून हटवा, अशी मागणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने केली. मग बलात्कारपीडित निर्भयाच्या माता-पित्यांना तेव्हा नरेंद्र मोदीही (Narendra Modi) भेटलेच होते. त्या फोटोला राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेतल्याचे दिसत नाही. हे असे आणखी किती काळ चालायचे? बलात्कार, महिला अत्याचारास तरी जात, धर्म आणि राजकीय पक्ष नसावेत! अशी भुमिका त्यांनी सामनाच्या रोखठेक या सदरातून मांडली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com