Twitter Blue tick : फ्री वाली ब्लू टीक झाली बंद; आता किती पैसे मोजावे लागणार?

ब्लू टीकसाठी महिना 900 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
Twitter Blue tick
Twitter Blue tickSaam TV
Published On

Twitter Blue tick : सध्याच्या घडीला प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर आहे अॅक्टीव आहे. फेसबुक, इंस्टाग्राम यांच्यासह ट्विटरवर देखील विविध पोस्ट व्यक्ती शेअर करत असतात. अशात ट्विटर युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ट्विटरवर मिळणारी फ्रीमधील ब्ल्यू टीक आता बंद करण्यात आली आहे. या ब्ल्यू टीकसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. (Latest Twitter Blue Tick)

सोशल मीडिया युजर्सना त्यांचे फॉलोवर्सचे काही आकडे पूर्ण केल्यावर ब्ल्यू टीक मिळत होती. त्यामुळे अनेक युजर्स आपले फॉलोवर्स वाढवण्याकडे लक्ष देत होते. आता ही पद्धत बंद झाली आहे. मयक्रोब्लॉगिंग मार्फत गुरुवारी या बाबत माहिती देण्यात आली आहे. ब्लू टीकसाठी महिना 900 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Twitter Blue tick
Twitter Verified Accounts Features : ट्विटरचे वेरिफाइड पुन्हा बदलेले, एलॉन मस्कने लॉन्च केले हे 3 रंग

ट्विटरने वेबसाठी 650 रुपये आणि ॲप वापरणाऱ्यांसाठी 900 रुपये दर ठरवले आहेत. यात फोन नंबरचे व्हेरिफिकेशन झाल्यावर त्या युजर्सना ब्लू टीक दिली जाणार आहे.या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने वेब युजर्ससाठी वर्षांचा प्लॅन देखील दिला आहे. त्यासाठी युजर्सना वर्षासाठी 6,800 रुपये मोजावे लागतील.

Twitter Blue tick
Twitter News: ट्विटर युजर्सना मोठा धक्का; या कारणामुळे अचानक अकाउंट बंद...

यूट्यूब प्रमाणे कमवता येणार पैसे

एलन मस्कने या बाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ब्लू टीकमुळे त्या व्यक्तींना पैसे कमविण्याची एक संधी मिळणार आहे. यूट्यूब प्रमाणे इथे देखील कंटेंन्ट रायटर्ससाठी रोजगार उपलब्ध होत आहे.

ही सुविधा फक्त ब्लू टीक असलेल्या व्यक्तींनाच आहे. यामध्ये ब्लू टीक मिळाल्यावर त्या व्यक्तीच्या ट्विटर अकाऊंटवर जाहिराती चालवण्यात येणार आहेत. या जाहिराती मार्फत मिळणाऱ्या पैशांची काही टक्के रक्कम ट्विटर युजर्सना दिली जाईल.

यूट्यूबवर जाहिरात लागल्यावर जसे पैसे दिले जातात तशाच प्रकारे आता ट्विटरवर देखील मिळणार आहेत. पैसे कमवण्याचा हा मार्ग कधीपासून सुरू होणार हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com