BJP MLA News : भाजप आमदाराचं विधानसभेत भलतंच काम; अश्लील VIDEO पाहण्याचा आरोप

Political News : विधानसभा अधिवेशन सुरू असताना सभागृहात खुर्चीवर बसून आमदार मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Beed News
Beed NewsSaam Tv
Published On

Tripura News : त्रिपुरामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून भाजपने सत्ता मिळवली. कम्युनिस्ट पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यात सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणाऱ्या भाजप आमदाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना सभागृहात खुर्चीवर बसून आमदार मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

Beed News
CM Shinde On Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात, सर्वांनी एकोपा कायम राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

व्हायरल झालेला व्हिडिओ आज (३० मार्च) त्रिपुरा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यानचा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप (BJP) आमदार जादब लाल नाथ दिसत आहेत. भाजप आमदार जादब लाल नाथ आपल्या सीटवर बसून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे दिसत आहे.

जादब लाल नाथ मोबाईल फोनवर व्हिडिओ (Viral Video) पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले. भाजप आमदार जादब लाल नाथ यांच्यावर विधानसभेच्या कामकाजादरम्यान अश्लील व्हिडिओ पाहिल्याचा आरोप आहे. जादब लाल नाथ यांचा हा व्हिडिओ 30 मार्चचा असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Beed News
Nitin Gadkari News: मुंबई-गोवा महामार्गाविषयी स्वत: नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...

जादब लाल नाथ हे बागबासाचे आमदार आहेत.

सीपीएमच्या बलाढ्य बालेकिल्ल्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या बागबासा विधानसभा मतदारसंघात जादब लाल नाथ यांनी भाजपच्या विजयाचा झेंडा फडकवला होता. 2018 च्या निवडणुकीतही भाजपला बागबासा विधानसभा जागा जिंकता आली नाही. 

2018 च्या निवडणुकीत सीपीएमच्या बिजीता नाथ यांनी भाजपच्या प्रदीप कुमार नाथ यांचा 270 मतांनी पराभव केला. 2023 च्या निवडणुकीत बागबासा येथे भाजपचे जाधव लाल नाथ यांनी सीपीएमच्या बिजीता नाथ यांचा विजयी रथ रोखला. जादब लाल नाथ यांनी सीपीएमच्या विद्यमान आमदार बिजीता नाथ यांचा 1400 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com