नवी दिल्ली : देशात तीन तलाकची Triple Divorce प्रकरणे ८०% कमी प्रमाणात झाली आहेत. कायदा लागू होण्याअगोदर यूपी UP मध्ये ६३ हजार प्रकरणे होती. जी कमी होऊन २२१ राहिली आहेत. तसेच बिहार Bihar मध्ये ४९ प्रकरणे हे समोर आली आहेत. नवी दिल्ली New Delhi मध्ये २ दिवसाअगोदर आरोपी पुरुषाला ३ वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले आहे की, मुस्लिम महिला प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऑन मॅरेज Muslim Women Protection of Rights on Marriage कायदा लागू झाल्यावर तिहेरी तलाक प्रकरणांमध्ये ८०% कपात झाली आहे. या कायद्याला २ वर्षे पूर्ण झाल्यामुळे दिल्ली मध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे सांगितले आहे.
हे देखील पहा-
१ ऑगस्ट २०१९ दिवशी कायदा अंमलात येण्याअगोदर, उत्तर प्रदेशा मधील ६३ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली होती. जी कायदा अंमलात आल्यावर २२१ प्रकरणे राहिली आहेत. त्याच वेळेस, कायदा लागू झाल्यावर, बिहारमध्ये फक्त ४९ प्रकरणे त्यावेळी नोंदवण्यात आली आहेत. नकवी म्हणाले की, आता तिहेरी तलाक हा गुन्हेगारी कायदा बनला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमधील राम मंदिराचा प्रश्न सोडवला. जम्मू -काश्मीरमधून कलम ३७० हटवले आणि महराम कायदा देखील रद्द करण्यात आला. ३५०० हून अधिक मुस्लिम महिलांनी महरमशिवाय हज यात्रा केली आहे. मुस्लिम महिलांच्या संघर्षाला सलाम करण्याचा हा दिवस आहे. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की मुस्लिम महिला हक्क दिन हा मुस्लिम महिलांच्या भावनेला आणि संघर्षाला सलाम करण्याकरिता आहे.
ंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव देखील या कार्यक्रमात सहभागी होते. तिहेरी तलाक मुस्लिम महिला- विवाहावर हक्कांचे संरक्षण विधेयक ३० जुलै २०१९ दिवशी राज्यसभेत मंजूर झाला आहे. राज्यसभेत मतदानाच्या दरम्यान विधेयकाच्या बाजूने ९९ आणि विरोधात ८४ मते पडलेली होती. २५ जुलै २०१९ दिवशी लोकसभेने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी देण्यात आली. तिहेरी तलाक कायद्यानुसार दोषी व्यक्तीला ३ वर्षांची शिक्षा यापुढे होणार आहे. याव्यतिरिक्त, पीडित महिला स्वतःसाठी आणि अल्पवयीन मुलांच्या देखभालीची मागणी देखील करू शकणार आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.