
जम्मू-काश्मीरच्या अवंतपोरामधील त्रालमध्ये लष्कराला मोठं यश आलं. आज सकाळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ३ दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला. त्रालमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. याचदरम्यान या चकमकीमध्ये ठार झालेल्या आमिर वानीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर आपल्या कुटुंबीयांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलताना दिसत आहे.
आमिर वानीने चकमक सुरू असताना आपल्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क केला होता. यावेळी आमिरची आई त्याला परत येण्यासाठी विनंती करत होती. पण त्याने आईचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला. आमिरचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये दिसत आहे की, आमिरची आई त्याला स्थानिक भाषेमध्ये विनवनी करत आहे. 'बाळा तू सरेंडर करून टाक.', असं आमिरची आई त्याला सांगते. पण आमिर आईचे ऐकत नाही आणि जवानांवर गोळीबार करतो. शेवटी या चकमकीमध्ये आमिर मारला जातो.
आमिर व्हिडिओ कॉलवर आईशी संवाद साधत असतो. त्यावेळी त्याची आई आणि बहीण रडत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. आमिरला ती समजावण्याचा बराच प्रयत्न करते पण आमिर तिचं ऐकत नाही. आमिरची आई त्याला सांगते की, 'बाळा तू सरेंडर कर.' तर आमिर तिला म्हणतो की, 'जवानांना पुढे तर येऊ दे मग मी बघतो.' आमिरचा हा व्हिडिओ चकमकीच्या पूर्वीचा आहे. ज्या घरामध्ये आमिर त्याच्या इतर दहशतवादी साथिदारांसोबत लपून बसला होता त्याच घरातून त्याने व्हिडिओ कॉल केला होता. आईशी बोलताना आमिरच्या हातामध्ये एके-४७ रायफल देखील दिसत आहे.
आमिरसोबत आमिरची बहीण, आई आणि या चकमकीमध्ये मारला गेलेल्या आसिफची बहीण देखील बोलत होती. आसिफची बहीण आमिरला विचारतो की, 'माझा भाऊ कुठे आहे.' आसिफ तोच दहशतवादी आहे ज्याचे घर भारतीय लष्कराच्या जवानांनी आयईडी ब्लास्ट करून उद्ध्वस्त केले होतो. जवानांनी त्रालमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना सरेंडर होण्यास सांगितले होते. पण त्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर या चकमकीमध्ये ३ दहशतवादी ठार झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.