Afganistan | गरिबी दाखवली म्हणून तालिबान्यांची पत्रकारासह कॅमेरामॅनला मारहाण

अफगाणिस्तानमधली गरिबी आणि बेरोजगारी दाखवली म्हणून तालिबान्यांनी एका पत्रकारासह त्याच्या कॅमेरामॅनला बेदम मारहाण केली करत त्यांचा मोबाईल आणि कॅमेरा जप्त केला आहे.
Afganistan | गरिबी दाखवली म्हणून तालिबान्यांची पत्रकारासह कॅमेरामॅनला मारहाण
Afganistan | गरिबी दाखवली म्हणून तालिबान्यांची पत्रकारासह कॅमेरामॅनला मारहाणSaam Tv News
Published On

काबुल: अफगाणिस्तान (Afganistan) ताब्यात घेतल्यानंतर तालिबान (Taliban) तिकडे उन्माद माजवतोय. खासकरुन समाजसेवक, वकील, सरकारी अधिकारी, पत्रकार आणि महिला या तालिबानच्या निशाण्यावर आहेत. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूज (TOLO News) या वृत्तसंस्थेचे रिपोर्टर वृत्तांकन करत असताना तालिबानी तिथे आले आणि त्यांना वृत्तांकन करण्यापासून रोखले. एवढंच नाही तर तालिबान्यांनी पत्रकारासह सोबतच्या कॅमेरामॅनलाही मारहाण केली आहे (Beaten by Taliban) त्यामुळे अफगाणिस्तानातील पत्रकारांच्या सुरक्षेबाबतची भिती खरी ठरतेय. (TOLO News Reporter and Cameraman Beaten by Taliban)

हे देखील पहा -

टोलो न्यूजचे पत्रकार झियार याद (Ziar Khan Yaad) आणि त्यांचा कॅमेरामॅन बायस मजिदी (Baes Majidi) हे काबुल शहरातील (Kabul city) शाहर-ए-नवा (Shahr-e-Naw) परिसरातील हाजी याकूब चौकात बेरोजगार लोक आणि मजुरांचे चित्रीकरण करत होते. तेव्हा काही तालिबानी तिकडे आले आणि विनाकारण पत्रकारासह कॅमेरामॅनला मारहाण केली. झियार याद हे काबुलमधील बेरोजगारीवर स्पेशल रिपोर्ट करत होते. ते म्हणाले की, “आम्ही फुटेज घेत असताना काही तालिबानी आले आणि आम्ही कोण आहोत हे न विचारता मोठ्या आवाजात ओरडले. माझा मोबाईल फोन आणि माझ्या कॅमेरामॅनचा कॅमेरा जप्त केला असल्याचं याद म्हणाले. तसेच "आम्ही आमचे रिपोर्टर बॅज दाखवले पण त्यांनी येऊन आम्हाला कानाखाली मारली आणि आम्हाला त्यांच्या बंदुकांनी मारहाण केली." असाही आरोप पत्रकार याद यांनी केला आहे.

तालिबानने अफगाणिस्तानातील ३३ प्रांत आणि राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर अनेक पत्रकारांना मारहण केली आहे. पत्रकार हिज्बुल्लाह रोहानी म्हणाले की, "ही अफगाण पत्रकारांसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे आणि आम्ही इस्लामिक अमीरातला या समस्यांचे निराकरण करण्याची विनंती करतो." दरम्यान, तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वसीक (Ahmadullah wasiq) म्हणाले की, ''पत्रकार झियार यादसोबत घडलेल्या घटनेबाबत तालिबान गंभीर आहे आणि ही घटना का घडली ते अधिकारी ठरवतील. एवढेच नाही. तर आम्ही पत्रकारांच्या कोणत्याही समस्यांची चौकशी आणि निराकरण करू असं आश्वासन तालिबानने दिलं आहे.

Afganistan | गरिबी दाखवली म्हणून तालिबान्यांची पत्रकारासह कॅमेरामॅनला मारहाण
चिंतेत भर! देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता?

दरम्यान रॉयटर्स या वृत्तसंस्थेतील भारतीय छायाचित्र पत्रकार दानिश सिद्दीकी (danish siddiqui) यांची तालिबान्यांनी अफगाणिस्तानात हत्या केली होती. तालिबानने अफगाणिस्तानाचा कब्जा मिळवल्यानंतर अनेक वृत्तसंस्थांच्या कार्यालयांचाही ताबा घेतला. अनेक महिला वृत्तनिवेदकांना काम करण्यास बंदी घातली त्यामुळे अफागाणिस्तानातील प्रसारमाध्यमांमध्ये दहशत माजली आहे. सध्या काबुल विमानळावरुन अमेरिकन लष्कर विदेशी नागरिकांना रेक्यु करत असून तालिबानने ३१ ऑगस्टपर्यंत देश सोडण्याचा इशारा अमेरिकेला दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com