Titanic Submarine Missing: टायटॅनिक पाणबुडीचा ऑक्सिजन संपला, पाच अब्जाधीशांचा अद्यापही ठावठिकाणा नाही

टायटॅनिक पाणबुडीचा ऑक्सिजन संपला, पाच अब्जाधीशांचा अद्यापही ठावठिकाणा नाही
Titanic Submarine Missing
Titanic Submarine MissingSaam Tv
Published On

Titanic Submarine Missing Update: रविवारी समुद्रात बुडलेल्या टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली बेपत्ता पाणबुडीचा अद्यापही शोध लागलेला नाही. या पाणबुडीत पाच अब्जाधीश होते, ज्यांचा शोध जोरात सुरू आहे.

गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या पाणबुडीतील ऑक्सिजन संपला आहे, असं काही अमेरिकन माध्यमांनी सांगितलं आहे. यामुळे ऑक्सिकाच्या कमतरतेमुळे यामधील प्रवाशांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Titanic Submarine Missing
Shabana Azmi Latest News: लुटने वाला जाएगा, नया जमाना आयेगा: शबाना आझमी

टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेली आणि बेपत्ता झालेल्या या पाणबुडीचे नाव टायटन आहे. ही एक लहान कॅप्सूल-आकाराची पाणबुडी आहे. ज्यात पाच जण बसू शकतात. ही पाणबुडी 6.7 मीटर लांब, 2.8 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंच आहे.  (Latest Marathi News)

याशिवाय बाहेर पाहण्यासाठी यात फक्त 21 इंचाची खिडकी आहे. टायटॅनिकपर्यंत पोहोचून परत यायला आठ तास लागतात. टायटॅनिकचे अवशेष 12,500 फूट खोलीवर आहे, जिथे जाण्यासाठी दोन तास, टायटॅनिक पाहण्यासाठी चार तास आणि तिथून परत येण्यासाठी दोन तास लागतात.

Titanic Submarine Missing
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा भाकरी फिरणार; अजितदादांचं नाव चर्चेत असतानाच बड्या नेत्याचा प्रदेशाध्यक्षपदावर दावा?

दोन तासांपेक्षा कमी कालावधीत टायटनशी संपर्क तुटला

रविवारी पोलर प्रिन्स या जहाजाद्वारे पाणबुडी समुद्रात सोडण्यात आली. मात्र एक तास 45 मिनिटांनी त्याचा जहाजाशी संपर्क तुटला. ही पाणबुडी अमेरिकेच्या किनारपट्टीपासून केप कॉडच्या 900 नॉटिकल मैल पूर्वेला बेपत्ता झाली.

रविवारी पाणबुडीच्या कमांड शिप पोलर प्रिन्सने यूएस कोस्ट गार्डला सांगितले की, त्यांचा पाणबुडीशी संपर्क तुटला आहे. यानंतर अमेरिकेने पाणबुडीचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली असून ती अजूनही सुरू आहे. पाणबुडी शोधण्यासाठीही रोबोटचा देखील वापर केला जात आहे.

पाणबुडीत आहेत पाच अब्जाधीश

ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश देखील बेपत्ता पाणबुडीवर आहेत. तेच या पाणबुडीचे पायलट आहे. याशिवाय यात टायटन पाणबुडीत ब्रिटीश उद्योगपती हॅमिश हार्डिंग, फ्रेंच डायव्हर पॉल हेनरी नार्गिओलेट, पाकिस्तानी अब्जाधीश शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेबान दाऊद हे देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com