Viral Video : थंडीने भरली हुडहुडी; बचावासाठी भावाने कहरचं केला, दुचाकीवर लावली आग अन्....

मागे बसलेल्या तरुणाने चक्क दुचाकीवर आग लावली आहे.
Viral Video
Viral Video Saam TV

Viral Video: सध्या सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. शहरांत आणि गावांत सर्वत्र पेटलेल्या शेकोट्या अजूनही कायम आहेत. थंडीमध्ये दुचाकीवरून प्रवास करणे म्हणजे खतरों के खिलाडी म्हटल्यासारखं आहे. त्यामुळे अनेक जण थंडीमध्ये दुचाकीवरून प्रवस करणे टाळतात. कितीही थंडी असली तरी या थांडीवर मात करण्यासाठी लोकांकडे एकापेक्षा एक जुगाड आहेत. सध्या असाच एक जबरदस्त जुगाड असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. (Latest Viral Video)

दुचाकीवरून प्रवास करताना थंडीपासून बचाव व्हावा म्हणून तुम्ही काय कराल? सर्वच जण यासाठी स्वेटर, शाल, कानटोपी अशा गोष्टी वापरतात. मात्र एका तरुणाने या थंडीपासून वाचण्यासाठी एक भन्नाट उपाय केला आहे. चला तर जाणून घेऊ या तरुणाने केलंय तरी काय?

Viral Video
Sports Bike : Pulsar आणि Apache ची क्रेझ होणार कमी ; 'या' बड्या कंपनीच्या तब्बल 9 बाइक्स होणार लॉन्च !

व्हायरल होतं असलेल्या एका व्हिडिओमध्ये दोन तरुण दुचाकीवरून चालले आहेत. प्रवास करत असताना दोघांनी देखील अंगावर स्वेटर घातलेलं दिसत आहे. मात्र थंडी थोडी जास्तच आहे भावा असं म्हणत यातील मागे बसलेल्या तरुणाने चक्क दुचाकीवर आग लावली आहे. म्हणजे हा तरुण दुचाकीवर उलट्या दिशेने बसला आहे आणि मागे पकडण्याच्या हॅण्डलला त्याने एक शेकोटी बनवली आहे. या शेकोटिवर तो मस्त थंडीपासून स्वतःला वाचवत आहे.

व्हायरल होतं असलेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचे समजले आहे. आता तरुणाने केलेली ही शेकोटी त्याला जरा महागात देखील पडली आहे. त्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. इंदौरचे वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल पाटीदार यांनी म्हटले आहे की, तरुणाने केलेल्या स्टंटमुळे रस्त्याने प्रवास करत असलेल्या इतर प्रवाशांना याचा त्रास होण्याची शक्यता होती. त्यामुळे सध्या त्याचा शोध सुरू असून त्याला ताब्यात घेतल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com