चोरी केल्यानंतर दांपत्यांची माफी मागत चोर म्हणाले, ६ महिन्यात पैसे परत करु

सोमवारी, मध्यरात्री 3-4 वाजता दोन मुखवटाधारी सशस्त्र चोरांनी गेट कापून त्यांच्या घरात प्रवेश केला.
चोरी केल्यानंतर दांपत्यांची माफी मागत चोर म्हणाले, ६ महिन्यात पैसे परत करु
चोरी केल्यानंतर दांपत्यांची माफी मागत चोर म्हणाले, ६ महिन्यात पैसे परत करु Saam tv
Published On

अलीकडच्या काळात चोरीच्या (Theft) घटना सामान्य झाल्या आहेत. पण गाझियाबादमधून (Ghaziabad) उघडकीस आलेली चोरीची घटना थक्क करणारी आहे. गाझियाबादमधील राजनगरमध्ये चोरीची एक आश्चर्यकाराक घटना समोर आली आहे. जिथे चोरांनी चोरी केली, नंतर ज्यांच्या घरात चोरी केली त्या दांप्त्याला 500 रुपये देऊन माफी मागत त्यांनी 6 महिन्यांत संपूर्ण पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन निघून गेले.

हे देखील पहा-

मीडिया रिपोर्टनुसार, सुरेंद्र वर्मा आणि त्यांची पत्नी अरुणा वर्मा हे वृद्ध दाम्पत्य राजनगर सेक्टर 9 मध्ये राहतात. त्यांना तीन विवाहित मुली आहेत, त्या परदेशात राहतात. मात्र सोमवारी, मध्यरात्री 3-4 वाजता दोन मुखवटाधारी सशस्त्र चोरांनी गेट कापून त्यांच्या घरात प्रवेश केला. दाम्पत्याला ओलीस ठेवून लाखो रुपयांचे दागिने लुटले. खरं तर, कोणालाही कानोकान खबर न होता सफाईदारपणे चोरी करणे हे चोराचे काम आहे, पण या चोरट्यांनी तसे केले नाही. सर्व चोरी केल्यानंतर निघण्यापूर्वी त्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या पायाला स्पर्श करून माफी मागितली.

चोरी केल्यानंतर दांपत्यांची माफी मागत चोर म्हणाले, ६ महिन्यात पैसे परत करु
Pune Covid19 update: गणेशोत्सवात नवीन निर्बंध नाहीत, पण...

एवढेच नाही तर निघताना चोरट्यांनी 500 रुपयेही दिले आणि माफी मागितली आणि आम्ही सहा महिन्यांनी पैसे आणि दागिने परत करू, असेही सांगितले. चोर निघून गेल्यानंतर दांपत्यांनी पोलीसांना चोरीची माहिती दिली. माहिती मिळताच कवीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले, गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com