Corona Update: दिल्लीत कोरोनाचा वेग दुप्पट; सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांच्या पुढे

दिल्लीतील सक्रिय रुग्णांचीसंख्या 8045 वर पोहोचली आहे.
Corona News
Corona NewsSaam tv

नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीतील कोरोनाबाधित (Corona) रुग्णांचा संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिल्लीत (Delhi)संसर्ग दर 15 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या ६ महिन्यांतील हा उच्चांक आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या 10 दिवसांत संसर्गाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. कोरोनाची नवीन प्रकरणे गेल्या 6 महिन्यांतील सर्वाधिक आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांच्या पुढे गेली आहे. रविवारपर्यंत दिल्लीतील सक्रिय रुग्णांचीसंख्या 8045 वर पोहोचली आहे.

हे देखील पाहा -

दिल्लीत संसर्ग दर 14.97 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी 22 जानेवारीला संसर्ग दर 16.36 टक्के होता. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 2423 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे 3 फेब्रुवारीनंतरचे सर्वाधिक आहे. यापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी 2668 रुग्ण दाखल झाले होते.

ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे 3771 सक्रिय रुग्ण वाढले आहेत. 1 ऑगस्ट रोजी दिल्लीत 4274 सक्रिय प्रकरणे होते, जी 7 ऑगस्ट रोजी 8045 झाली आहेत. 10 दिवसांत संसर्गाचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे. 29 जुलै रोजी संसर्ग दर 7.3 होता, जो 7 ऑगस्टपर्यंत वाढून सुमारे 15 टक्के झाला आहे.

Corona News
हल्ला झाला त्याच कात्रज चौकात उदय सामंत घेणार सभा; शिंदे गट देणार प्रत्युत्तर

देशभरातील कोरोनाच्या प्रकरणांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासात 16,167 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी, 15,549 लोक बरे झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 510 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, संसर्ग दर 6.14% वर गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 4 कोटी 41 लाख 61 हजार 899 रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, संसर्गामुळे मृतांची संख्या 5 लाख 26 हजार 730 वर पोहोचली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com