मंत्र्याने दिला होता एन्काऊंटरचा इशारा, दुसऱ्याच दिवशी बलात्कारी मृतावस्थेत...
मंत्र्याने दिला होता एन्काऊंटरचा इशारा, दुसऱ्याच दिवशी बलात्कारी मृतावस्थेत...Saam Tv News

मंत्र्याने दिला होता एन्काऊंटरचा इशारा, दुसऱ्याच दिवशी बलात्कारी मृतावस्थेत...

तेलंगाणाच्या सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी एका सहा वर्षीय चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमाने बलात्कार केला होता. हा नराधम तेव्हापासून फरार होता.
Published on

तेलंगणा: तेलंगाणाच्या सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी एका सहा वर्षीय चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमाने बलात्कार केला होता. हा नराधम तेव्हापासून फरार होता. आता या नराधमाचा मृतदेह घानपुर भागातील रेल्वे रुळावर आढळला आहे. त्याच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे आरोपीची ओळख पटली आहे. तेलंगणा पोलिसांच्या प्रमुखांनी मृतदेहाची ओळख पटवली असून या बातमीला दुजोरा दिला आहे. (The minister had warned of an encounter, the next day the rapist died ...)

हे देखील पहा -

तेलंगणामधील सैदाबादमध्ये गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील ३० वर्षीय आरोपी राजू हा पीडितेचा शेजारी होता. त्याने ६ वर्षीय चिमुरडीशी मैत्री केली होती. मात्र नंतर मुलगी घरातून बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर आरोपीच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तेव्हापासून, पोलिसांनी तयार केलेल्या तब्बल नऊ विशेष टीम फरार आरो्पीचा शोध घेत होत्या. आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्या व्यक्तीचा फोटो आणि इतर माहिती जाहीर केली होती.तसेच हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी आरोपीची ओळख पटवून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षिस देण्यात येईल, असं जाहीर केलं होतं.

मंत्र्याने दिला होता एन्काऊंटरचा इशारा, दुसऱ्याच दिवशी बलात्कारी मृतावस्थेत...
ऋतिक रोशनच्या सेल्फीमध्ये असं काय दिसलं की, लोकांनी खिल्ली उडवली...

याबाबत तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी बुधवारी म्हणाले होते ''फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करण्यात येईल, आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही.'' मंत्र्याच्या या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर संशयास्पद स्थितीत आढळल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रेनसमोर उडी मारल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com