काबुल: अफगाणिस्तानात (Afganistan) अब्दुल मलिक याने पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीला पोटाची खळगी भरण्यासाठी ५५ वर्षीय वृद्धाला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःचे कुटुंब चालवण्यासाठी हा पर्याय निवडावा लागल्याचे मुलीच्या बापाने सांगितले आहे. कुटुंबात एकूण आठ व्यक्ती असल्यानं पैशांचा भार सहन नव्हता होत. चार वर्षांपासून अब्दुल अफगाणिस्तानच्या बडघिस प्रांतात एका स्थलांतरित लोकांच्या वस्तीमध्ये त्यांच्या परिवारासह राहत आहेत. रोजंदारी करून माणसाला दिवसाला जेमतेम १७२ रुपये मिळतात.
तालिबान सत्तेत आल्यापासून तिथली आर्थीक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. " तेथील लोकांना घर चालवणे आता पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे. माझ्या मुलीला लग्नासाठी विकण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता.", असे अब्दुलने सांगितले. १ लाख ६४ हजार रुपये किमतीच्या नगद, जमीन आणि मेंढाऱ्यांच्या मोबदल्यात अब्दूलने त्याने हा व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, इतके पैसे मिळूनही अब्दुल मलिक हा कर्जातून बाहेर येणार नाही, असे सांगतो.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.