संतोष शाळीग्राम (नवी दिल्ली)
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन (Farmer Protest) संपवण्याची घोषणा लवकरच होऊ शकते. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारसोबतची चर्चा सकारात्मक दिशेने पुढे सरकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारकडून (Central Government) शेतकऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. सरकार एमएसपी हमी कायद्यावर समिती स्थापन करणार आहे. आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी ग्वाही सरकारने दिल्याचे समजते. उद्या आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. (The farmers' agitation which has been going on for a year will finally stop ?)
हे देखील पहा-
सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी चर्चा करत आहेत. शेतकरी परतीच्या आंदोलनाबाबत निर्णय घेऊ शकतात. एमएसपीवर कायदेशीर हमीभाव, शेतकऱ्यांवरील खटले परत करावेत, शेतकरी आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांवर शेतकरी लेखी हमी मागत होते.
सरकारने आंदोलक शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले असून एमएसपी हमीभावासह त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन स्थगित करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पंजाब आणि दिल्लीच्या सीमेवर सुमारे 15 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.