डबल डेकर बस खोल दरीत कोसळली; 21 जखमी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -9 (NH-9) वर एक वेगाने जाणारी दुहेरी खासगी बस अनियंत्रितपणे गेली आणि बॅरिअर तोडून 20 फूट खोल दरीत उलटली आहे.
डबल डेकर बस खोल दरीत कोसळली; 21 जखमी
डबल डेकर बस खोल दरीत कोसळली; 21 जखमीSaam Tv
Published On

दिल्ली-लखनऊ: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -9 (NH-9) वर एक वेगाने जाणारी दुहेरी खासगी बस अनियंत्रितपणे गेली आणि बॅरिअर तोडून 20 फूट खोल दरीत उलटली आहे.

मंगळवारी रात्री उशिरा या अपघाताची माहिती मिळाली. घटनास्थळापासून थोड्या अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या टोल प्लाझाला Toll Plaza असलेल्या इतर वाहनांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत मुरादाबाद पोलिसांना माहिती दिली.

हे देखील पहा-

बस अपघाताची Bus Accident माहिती मिळताच मुरादाबाद पोलिसांचे अधिकारी, तसेच आरोग्य विभाग, अग्निशमन दल, परिवहन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि उलटलेल्या बसमधील 100 हून अधिक प्रवाशांची सुटका केली. जखमींना 5 रुग्णवाहिकांनी घटनास्थळी मुरादाबाद आणि रामपूरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले. 19 गंभीर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी प्रवाशांनी सांगितले की, ते बरेलीहून सीतापूरहून येणाऱ्या बसमध्ये चढले होते. बस भरधाव वेगाने जात होती. वाटेत बसचा चालक बदलण्यात आला. ड्रायव्हर बदलल्यानंतर थोड्याच वेळात, बस अचानक रस्त्यावरील क्रॅश बॅरिअरला धडकली, ती तुटली आणि खालच्या खाईत उलटली.

डबल डेकर बस खोल दरीत कोसळली; 21 जखमी
दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात; शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला रवाना

बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी;
या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी होते. 19 प्रवासी गंभीर जखमी झाले. जर खड्डा जास्त पाण्याने भरला असता तर बस त्यात अर्ध्याहून अधिक बुडली असती तर अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला असता असे तेथील नागरिकांनी सांगितले. मुरादाबादचे पोलीस अधीक्षक अमित आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस उलटून जखमी झालेल्या 21 प्रवाशांपैकी 7 प्रवाशांना रामपूर, 12 मुरादाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन प्रवाशांची गंभीर स्थिती पाहून त्यांना दुसऱ्या सेंटरकडे पाठवण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com