अयोध्येतील मंदिरे करमुक्त, मुख्यमंत्री योगींच्या आदेशानंतर घेतला निर्णय

अयोध्येतील मंदिरांबाबत (Ayodhya Temple) मोठा निर्णय
Tax Relief for Ayodhya Temples
Tax Relief for Ayodhya TemplesSaam Tv
Published On

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकाराने अयोध्येतील मंदिरांबाबत (Ayodhya Temple) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येतील मठ आणि मंदिरांना कर माफ करण्यात आला आहे. अयोध्या महापालिकेने (Municipal Corporation) यासाठी ठराव करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मठ मंदिरे करमुक्त करण्याच्या सीएम योगींच्या घोषणेवर महापालिकेने ठराव मंजूर केला आहे. मठ मंदिरांना आता फक्त प्रतिकात्मक कर भरावा लागणार आहे. ते सर्व मठ, मंदिरे आणि आश्रम करमुक्त करण्यात आले आहेत, जे व्यावसायिक वापरासाठी नाहीत. यासोबतच मंदिरांवरील थकीत करही माफ करण्यात आला आहे.

हे देखील पाहा-

कॅबिनेट मंत्र्यांनी दिली माहिती

यूपीचे कॅबिनेट मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी ट्विट करून लिहिले, 'अयोध्येतील मठ-मंदिर करमुक्त, थकबाकीदार करही माफ.करण्यात आला आहे.

Tax Relief for Ayodhya Temples
आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज

सीएम योगी यांनी घोषणा केली होती

याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले होते. अयोध्येतील मंदिरे आणि धर्मशाळा करमुक्त करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी तेथे केली होती. सीएम योगींच्या या घोषणेवर महापालिकेने प्रस्ताव आणून शिक्कामोर्तब केले आहे. अर्जुनदास आणि रमेशदास यांच्या नगरसेवकांच्या प्रस्तावावर आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे अयोध्येच्या महापौरांनी सांगितले. मंदिरांचा थकीत करही माफ होणार आहे.

या ठिकाणांची नावे बदलली

यासोबतच सीएम योगींच्या सूचनेनुसार अयोध्येतील उदया चौकाला लता मंगेशकर आणि टेधी बाजार चौकाला निषादराज यांच्या नावावर ठेवण्याच्या प्रस्तावालाही महापालिकेने मंजुरी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com