वृत्तसंस्था: देशातील कोळशाच्या संकटामुळे रेल्वेने पुढील २० दिवस किमान ११०० ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांसह (passengers) व्यापारी वर्गही नाराज झाला आहे. देशातील अनेक भागांतील वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळसा (Coal) संकटाचा सामना करावा लागत आहे. याला सामोरे जाण्यासाठी आणि कोळशाचा पुरवठा करण्यासाठी रेल्वे १५ टक्के अतिरिक्त कोळशाची वाहतूक करत आहे. या संदर्भात, रेल्वेने (Railways) पुढील २० दिवस सुमारे ११०० गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मेल एक्सप्रेस (Express) आणि पॅसेंजर या दोन्ही गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. एक्स्प्रेस गाड्यांच्या ५०० फेऱ्या, तर पॅसेंजर गाड्यांच्या ५८० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हे देखील पाहा-
कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी गाड्या थांबवल्या
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत जेणेकरून औष्णिक वीज केंद्राला पुरवल्या जाणार्या कोळशाने भरलेल्या मालगाड्यांना सहज मार्ग देता येईल, जेणेकरून कोळसा वेळेवर पोहोचू शकणार आहे. पुढील १ महिन्यासाठी रेल्वेने ६७० पॅसेंजर गाड्या आधीच रद्द केल्या आहेत. जेणेकरून कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांची वारंवारता वाढवता येईल. त्यामुळे छत्तीसगड (Chhattisgarh), ओडिशा, मध्य प्रदेश आणि झारखंड (Jharkhand) यांसारख्या कोळसा उत्पादक राज्यांतून ये- जा करणाऱ्या लोकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
अनेक राज्यात विजेचे संकट सुरू
उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा यासह अनेक राज्यांमध्ये कोळसा संकटामुळे विजेची समस्या निर्माण झाली होती. यानंतर सरकारने अनेक बैठका घेतल्या. अनेक राज्यांमध्ये वीजपुरवठा खंडितही करण्यात आला असून, त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
देशात विजेची विक्रमी मागणी वाढली
देशात यंदा कडक उन्हाचा सामना करावा लागत असून त्यामुळे एप्रिल महिन्यापासून विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विजेची मागणी वाढल्याने कोळशाचा वापरही वाढला आहे. त्यामुळेच वीजनिर्मिती केंद्रांकडे आता अवघ्या काही दिवसांचा कोळसा शिल्लक असून, त्यामुळे देशात विजेचे संकट निर्माण झाले आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी रेल्वेने आपल्या वतीने संपूर्ण सहकार्य देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. देशातील कोळशाच्या वाहतुकीचे बहुतांश काम रेल्वेने केले जाते.
कोळशाची मागणी आणि वापरात २० टक्के वाढ
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हीके त्रिपाठी म्हणाले, “गेल्या वर्षीपासून कोळशाच्या मागणीत आणि वापरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे आपण म्हणू शकतो. एप्रिल २०२२ मध्ये, आम्ही एप्रिल २०२१ च्या तुलनेत १५ टक्के जास्त कोळशाची वाहतूक केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कोळशाची मागणी आणि वापर लक्षणीय वाढला आहे, त्यामुळे आम्ही कोळशाची अधिक प्रमाणात वाहतूक करत आहोत. आम्ही अतिरिक्त कोळसा रेक चालवत आहोत आणि मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा जास्त प्राधान्य देत आहोत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.