वृत्तसंस्था : महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरण्याकरिता काँग्रेसतर्फे रविवारी जयपूरमध्ये (Jaipur) महागाई हटाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi), प्रियंका गांधी आणि राहुल गांधी सहभागी झाले होते. रॅलीच्या दरम्यान राहुल गांधी म्हणाले की, देशामध्ये २ शब्दांची टक्कर आहे. एक शब्द आहे, हिंदू तर दुसरा शब्द आहे हिंदुत्व. मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हे हिंदुत्ववादी. पुढे ते म्हणाले की, देशासमोर कोणती लढाई आहे आणि कुणामध्ये लढाई आहे, कोणत्या विचारसरणींमध्ये आहे. (The cause of inflation country pro Hindu)
पहा व्हिडिओ-
आपल्याला माहीत आहे की, कोणत्याही २ जीवांचा एक आत्मा असू शकत नाही. तसेच, दोन शब्दांचा अर्थ एकच असू शकत नसत. प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगळा असतो. देशात राजकारणामध्ये politics) आज दोन शब्दांची टक्कर सुरू आहे. त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. एक शब्द हिंदू आहे तर दुसरा शब्द हिंदुत्व आहे. ही एकच गोष्ट नाही. हे दोन भिन्न शब्द आहेत आणि त्यांचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले की, "मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी आजिबात नाही. हे सर्व हिंदू आहेत, पण हिंदुत्ववादी नाही.
आज मी तुम्हाला हिंदू आणि हिंदुत्ववादी यामधील फरक सांगायचा आहे. महात्मा गांधी हिंदू, गोडसे हिंदुत्ववादी. काही झाले तरी हिंदू सत्याचा शोध घेतो. गर पडली तर तो त्याकरिता जीवाचीही परवा करत नसतो. तो सत्याचा शोध घेत असतो. त्याचा मार्ग सत्याग्रहाचा आहे. तो संपूर्ण जीवन सत्याच्या शोधामध्ये घालवतो. महात्मा गांधींनी माय एक्सपिरियन्स विथ ट्रुथ हे आत्मचरित्र (Autobiography) लिहिले आहे, म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्याच्या प्रयत्नामध्ये घालवले आणि शेवटी एका हिंदुत्ववाद्याने त्यांच्या छातीवर ३ गोळ्या झाडले आहे, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
हिंदुवादी आपले संपूर्ण आयुष्य सत्तेच्या शोधामध्ये घालवत आहेत. त्याचा सत्याशी काही देखील संबंध नाही. त्याला फक्त सत्ता हवी असते आणि त्याकरिता तो काही करेल, कुणालाही मारेल, काही बोलेल, जाळून टाकेल, कापून टाकेल, त्याला सत्ता हवी आहे. त्यांचा मार्ग सत्याग्रह (Satyagraha) नसून सत्ताग्रह असतो. हिंदू उभा राहतो आणि भीतीला तोंड देतो आणि एक इंच देखील मागे राहत नाही. हिंदुत्ववाद्याला त्याची भीती बुडवते आणि ही भीती त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण करत असते, राग येतो. हिंदूंना भीतीचा सामना करावा लागत असतो. त्याच्या हृदयामध्ये शांती, प्रेम, शक्ती निर्माण होते. हाच हिंदुत्ववादी आणि हिंदू या मधील फरक आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.