भीषण! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस भर रस्त्यात उलटली, ७ जखमी

डेहराडून रोड पद्मिनी निवासजवळ एका बसचे नियंत्रण सुटल्याने अपघात (accident) झाला
Mussoorie bus accident
Mussoorie bus accident Saam Tv
Published On

मसुरी: डेहराडून रोड पद्मिनी निवासजवळ एका बसचे नियंत्रण सुटल्याने अपघात (accident) झाला आहे. या अपघातात एक कारही आली. अपघाताच्या वेळी बसमध्ये ३० विद्यार्थी (students) आणि ३ शिक्षकांसह वाहक आणि चालक होते. यामध्ये २ शिक्षक आणि ५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. मात्र, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या (police) मदतीने सर्व लोकांना बसमधून बाहेर काढण्यात आले असून जखमींना रुग्णालयात (hospital) हलविण्यात आले आहे.

हे देखील पाहा-

यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, बस पडल्यानंतर लगेचच सर्व लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहिले की बस एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर पडली आहे. बसमध्ये अडकलेली मुले मदतीसाठी आरडाओरड करत होती, त्यानंतर बसच्या खिडक्या तोडून नागरिकांनी मुलांची सुटका करण्यात आली. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच एसडीएम मसुरी नरेशचंद्र दुर्गापाल यांनी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती विचारपूस केली आहे.

Mussoorie bus accident
भाजप नेत्याला अटकेच्या प्रकरणात नवीन ट्विस्ट, पंजाब पोलिसांवर अपहरणाचा गुन्हा दाखल

एसडीएम मसुरी नरेशचंद्र दुर्गापाल यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ही घटना खूप मोठी आहे. परंतु, सुदैवाने बस रस्त्याच्या दुस-या बाजूला एका रस्त्यावरून आदळल्यानंतर थांबली. या संपूर्ण घटनेत ७ जण जखमी झाले असून त्यापैकी ५ विद्यार्थी आणि २ शिक्षक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या सर्वांवर मसुरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बसबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा स्थितीत घटनेचा अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. या संपूर्ण घटनेची दंडाधिकारी चौकशीही करण्यात येणार आहे. तपासणीत बसचालकांचा निष्काळजीपणा आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com