Budget Session 2023 : आणखी एक मुहूर्त टळला; यंदाही अर्थसंकल्पीय अधिवेशन जुन्या इमारतीत

सध्या नवीन संसदेचं काम सुरू आहे. ते पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं यंदाचं अर्थसंकल्प जुन्या इमारतीतच मांडला जाणार आहे.
Budget Session 2023
Budget Session 2023 Saam Tv
Published On

नवी दिल्ली - राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे अभिभाषण संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये होणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. सध्या नवीन संसदेचं काम सुरू आहे. ते पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं यंदाचं अर्थसंकल्प जुन्या इमारतीतच मांडला जाणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रूवारी रोजी २०२३ -२४ चा अर्थसंकल्प जुन्या इमारती मध्ये मांडणार आहेत. निर्मला सितारमन पाचव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहे.

Budget Session 2023
Maharashtra Politics : PM मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, देशात हुकूमशाही...

नवीन संसद भवनात अधिवेशन (Budget Session) घेण्याच्या सरकारच्या इच्छेची यंदाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पूर्तता होण्याची शक्यता नाही आहे. संसद अधिवेशन ३१ जानवरी ते १४ फेब्रुवारीपर्यंत चालेल. महिनाभराच्या मध्यंतरानंतर अधिवेशन १३ मार्चला पुन्हा सुरू होणार असून ते ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

Budget Session 2023
Shinde-Fadnavis Government: शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार; विरोधकांनी 'तो' दिवसच सांगितला!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्यमान इमारतीतच संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत अशी माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. तसेच नवीन इमारतीत हे अधिवेशन होऊ शकणार नाही अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवनाचे भूमीपूजन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com