मोदी सरकारच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये घट; नवी आकडेवारी आली समोर

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार मनमोहन सिंह सरकारच्या काळात 2004 ते 2013 मध्ये 9 हजार 321 दहशतवादी कारवाया झाल्या होत्या.
Narendra Modi
Narendra ModiSaam TV

शिवाजी काळे -

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या काळात जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) सरकारच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये घट झाली आहे. अशी माहिती आरटीआयला मोदी सरकारकडून देण्यात आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) घडलेल्या दहशतवादी घटना आणि मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या या संदर्भात देशाच्या गृहमंत्रालयाकडून माहिती मागितली होती. या RTI कार्यकर्त्यांच्या मागणीला आता मोदी सरकाने उत्तर दिलं असून मनमोहन सिंग सरकारच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात कमी दहशतवादी कारवाया झाल्या आहेत अशी माहिती सरकारने दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या काळात मनमोहन सिंह सरकारच्या तुलनेत दहशतवादी कारवाया, सुरक्षा यंत्रणांनी (Security systems) केलेल्या कारवाईत मारलेले दहशतवादी आणि दहशतवाद्यांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. किती दहशतवादी कारवाया झाल्या?

या संदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार मनमोहन सिंह सरकारच्या काळात 2004 ते 2013 मध्ये 9 हजार 321 दहशतवादी कारवाया झाल्या होत्या. तर मोदी सरकारच्या काळात 2014 ते ऑगस्ट 2022 पर्यंत 2 हजार 132 दहशतवादी कारवाया झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

मारले गेलेले दहशतवादी -

Narendra Modi
कोरोना योध्यांसाठी खुशखबर! 'त्या' कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत घेण्याचे न्यायालयाचे आदेश

मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2004 ते 2013 मध्ये सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवायांमध्ये 4 हजार 005 दहशतवादी मारले गेले. तर 2014 ते ऑगस्ट 2022 मध्ये सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवायांमध्ये 1 हजार 538 दहशतवादी मारले गेल्याची माहिती देखील सरकारने दिली आहे.

किती दहशतवाद्यांना अटक झाली?

2004 ते 2013 या काळामध्ये 1 हजार 28 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तर मोदी सरकारच्या 2014 ते ऑगस्ट 2022 च्या कार्यकाळात 1 हजार 432 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सरकारने RTI ला दिली असून याद्वारे त्यांनी मोदी सरकारच्या काळात कमी दहशतवादी कारवाया झाल्याची माहिती दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com