तालिबानचा नवा फतवा, आता अफगाणिस्तानात परकीय चलनावरही बंदी...

गंभीर आर्थिक संकटाशी सामना करत असलेल्या अफगाणिस्तानमध्ये आता इतर देशातील चलन वापरता येणार नाही. नव्या तालिबान सरकारने हा नवा निर्णय जाहिर केला आहे.
तालिबानचा नवा फतवा, आता अफगाणिस्तानात परकीय चलनावरही बंदी...
तालिबानचा नवा फतवा, आता अफगाणिस्तानात परकीय चलनावरही बंदी...Saam Tv
Published On

काबुल: तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून अफगाणिस्तान प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. जगाने अजूनही तालिबानला अफगाणिस्तानचे अधिकृत सरकार म्हणून मान्यता दिलेली नाही. जागतिक बॅंक, अमेरिका आणि यूरोपातील बॅंक यांमध्ये असलेले अफगाणिस्तान सरकारचे पैसे गोठवण्यात आले आहेत, त्यामुळे अफगाणिस्तान भयंकर आर्थिक संकटात सापडला आहे. यावर उपाय म्हणून अफगाणिस्तामधील नवीन तालिबान सरकारने अफगाणिस्तानात सर्व प्रकारच्या परकीय चलनावर बंदी आणली आहे. (Taliban's new order, now ban on foreign currency in Afghanistan)

हे देखील पहा -

तालिबान सरकारनं म्हटलंय, की राष्ट्रीय हितासाठी सामान्य नागरिक, व्यापारी, छोटे दुकानदार अफगाण चलन देशांतर्गत व्यवसायासाठी वापरतील. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई आणि कठोर शिक्षा होईल. सध्या अफगाणिस्तानच्या बाजारपेठेत अमेरिकन डॉलरचा वापर केला जातो, तर पाकिस्तानसारख्या शेजारी देशाचे चलन सीमाभागातील व्यापारासाठी वापरले जाते. मात्र आता अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी तालिबान सरकारने थेट परकीय चलन बंद करत एक प्रकारे जगापासून स्वतःलाच वेगळं केलंय. त्यामुळे तालिबानच्या या निर्णयाचा अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल की नाही हे याबद्दलही साशंकता आहे.

तालिबानचा नवा फतवा, आता अफगाणिस्तानात परकीय चलनावरही बंदी...
चीनला नेमकं करायचं काय? लोकांना अन्नधान्यांचा साठा करण्याचा दिला आदेश

दुसरीकडे आयसिस या दहशतवादी संघटनेने तालिबानी नेत्यांनाच निशाण्यावर धरले आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या इतक्या वरिष्ठ नेत्याचा मृत्यू झाला आहे. हमदुल्लाह मुखलीस असं या तालिबानी कमांडरचं नाव आहे. काबुलमधील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात मुखलीसचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली आहे. त्यामुळे देशांतर्गत दहशतवाद, बेरोजगारी, ढासाळलेली अर्थव्यवस्था, भुकबळी अशा असंख्य संकटांचा विळखा मात्र अफगाणिस्तानच्या निष्पाप जनतेला बसला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com